सावकारांच्या प्रचंड दहशतीमुळे कर्जदार हैराणः पठाणी व्याजाला जनता वैतागली
पुणे/अधोरेखित विशेष
महाराष्ट्र हे सधन राज्य म्हणून ओळखले जाते.तरीही राज्यात खासगी सावकारी मात्र चांगलीच फोफावली आहे.राज्यात काही खासगी सावकारांवर गुन्हे दाखल झाले.पण काही बड्या सावकारांची प्रचंड दहशत असल्याने कोणीही तक्रारी करायला धजावत नाहीत.प्रामुख्याने राजकीय वरदहस्तही खासगी सावकारी फोफावण्याला एक प्रकारे बळ देणारा ठरत आहे.
राज्यात काही खासगी सावकार तसेच त्यांच्या टोळ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.काही जिल्ह्यात मात्र तुलनेत खासगी सावकारांवर काही अपवाद वगळता कारवाई झाली नाही.याला वेगवेगळी कारणे कारणीभूत आहेत.खासगी अवैध सावकारी करणा-या अनेक टोळ्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आपले बस्तान बसवले आहे. गरजवंतांना शोधून त्यांना मोठय़ा प्रमाणात कर्जाऊ रक्कम देऊन आर्थिक मदतीच्या नावावर मोठय़ा प्रमाणात शोषण केले जात आहे. विशिष्ट वेळात दिलेल्या मुदतीच्या आत जर कर्जाची परतफेड झाली नाही, तर खासगी सावकार कर्जदात्याकडून त्याचे घर, शेती, प्लॉट जबरदस्तीने आपल्या नावावर करून घेत असतात.त्याचबरोबर दोन-चार चाकी गाड्या ओढून नेल्याची अनेक उदाहरणे नेहमी चर्चेत आहेत.
अल्पभूदारक शेतकरी खासगी सावकारांच्या त्रासाला वैतागले
जनतेत खासगी सावकारांची दहशत असल्याने त्यांच्याविरुद्ध कोणीही देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे अशा सावकारांचे धाडस वाढत आहे. ग्रामीण भागात शेतकरी हा शेती करणारा मोठा वर्ग आहे. ग्रामीण भागात शेती करण्यासाठी,सिंचनाची सोय करण्यासाठी, वेगवेगळे कृषी प्रयोग करण्यासाठी मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी,पाल्यांच्या शिक्षणासाठी,घर बांधणीसाठी,शेतीची अवजारे घेण्यासाठी पैशाची गरज लागते.पतसंस्थांकडून कर्ज घेतात, मात्र अल्पभूदारक शेतक-यांना खासगी सावकारांच्या पेढय़ावर जावे लागते. हे सावकार दागिने व इतर वस्तू गहाण ठेवून दरमहा किमान ५ ते अगदी १०० टक्के व्याज दराने अल्पभूदारक शेतकरी, मोलमजुरी करणारे अथवा खासगी नोकरी करणा-यांना कर्ज देतात.हे सावकार कर्ज देताना खूप गोड बोलतात, मात्र वसुली करताना हेका दाखवत आर्थिक पिळवणूक करतात.एक महिन्याचे व्याज थकले,तर व्याजावर चक्रवाढ व्याज आणि दर दिवसाला दंड आकाराला जातो.२० हजार घेतलेला कर्जदार दीड-दोन वर्षात दीड लाख रुपये व्याज भरतो; मुद्दल आहे ती तशीच राहते.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अवैध व बेकायदेशीर सावकारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात खासगी सावकार शिरजोर!
महाराष्ट्र हे सधन आणि क्रांतीकारकांचे राज्य म्हणून प्रसिद्ध आहे.विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रात समृद्ध शेतीबरोबरच उद्योग व्यवसायांचे जाळेही मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळेच राज्यात पश्चिम विभागाची गणना एक सधन विभाग म्हणून होत आहे.पण याच विभागात अनेक ठिकाणी विरोधाभासाचेही चित्र दिसून येत आहे.गेल्या १३-१४ वर्षात याच सधन विभागात शेकडो शेतकर्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्त्या केल्याची उदाहरणे आहेत.यातील बहुतांश शेतकर्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतल्याचे त्या-त्या वेळी पुढे आले होते.
या विभागात खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात चालते.विशेषकरून चौकाचौकात सावकार आहेत.काही नवीन सावकारही उदयास येत आहेत.खासगी सावकारीच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचे व्यवहार होत आहेत.त्यांची दुकानदारी खुलेआमपणे सुरू आहे.खासगी सावकारीतून अमाप मिळणार्या पैशाच्या मस्तीतून खासगी सावकारांनी अडलेल्यांना कर्जे देवून त्यांच्याकडून वसुली केल्याची उदाहरणे नेहमीच चर्चेत असतात.खासगी सावकारांची प्रचंड दहशत असल्याने गोरगरीब जनता त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही.खासगी सावकारीला कंटाळून काहींनी गाव सोडून दिल्याच्या घटना यापूर्वी चर्चेत आहेत.राजकारण्यांबरोबरच काही अधिकाऱ्यांच्या आजूबाजूला राहून रुबाब दाखवणारे काही खासगी सावकारही काही कमी नाहीत.सावकारांची प्रचंड दहशत,त्यांना असलेला राजकीय वरदहस्त,त्यांच्याकडे असलेली पैशाची ताकद,सहकार विभागाच्या अधिकार्यांची गांधारीची भूमिका अशी अनेक कारणे खासगी सावकारी फोफावण्याला कारणीभूत आहेत.
सोन्याआडची खासगी सावकारीही तेजीत
खासगी सावकारांबरोबरच काही सोने-चांदी व्यावसायिकांचीही खासगी सावकारी तेजीत सुरू आहे. सोने गहाणच्या नावाखाली खासगी सावकारीचा उद्योग जोरात सुरू ठेवला आहे.बँकांची कटकट नको म्हणून सर्वसामान्य जनता अशा व्यावसायिकांकडून कर्ज उचलते,पण त्यांचा व्याजाचा फटका इतका मोठा असतो की,गहाण ठेवलेले सोने त्याला परत मिळविणे दुरापास्त होते.
काही सोने-चांदी व्यावसायिकांकडूनही दरमहा ३ टक्क्यापासून ते १० टक्क्यांपर्यंत व्याजाची आकारणी केली जात आहे.दर महिन्याला पठाणी पद्धतीच्या व्याज आकारणीने अक्षरशः लूट सुरू करून सोने गहाणच्या नावाखाली वर्षाकाठी ३६ ते ४० टक्के व्याज वसूल केले जात आहे. सोने-चांदी व्यावसायिकांबरोबरच दररोज लाखो रुपयांचा कर्जपुरवठा करणार्या सावकारांची साखळीच कार्यरत आहे.या साखळीच्या माध्यमातून दररोज पठाणी पद्धतीने वसुली सुरू आहे.काहींकडून वसुलीसाठी साम,दाम,दंड यासह सार्याच मार्गाचा अवलंब केला जात आहे.खासगी सावकारीत अडकलेल्या अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या चर्चा सातत्याने सुरूच असतात.
हेही वाचा…
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी–बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई–मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप‘चा विळखा होतोय घट्ट
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष । राज्यात दिवसाढवळ्या दरोडा ?
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी !
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित’ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर.
दीपोत्सव 2021-माझी संस्कृती…माझा अभिमान
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित’ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर…!
ताज्या बातम्या,नोकरी अपडेट्स,माहितीचा खजिना मिळविण्यासाठी जॉईन व्हा…!
https://chat.whatsapp.com/GBANKcK4KlR9ymjY579u1z
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
वयोवृद्धाच्या अभंगाने प्रांताधिकारी भारावले
तुमचे नशीब बदलू शकते,घराच्या भिंतीवरचे घड्याळ लावताना ‘हे’ लक्षात ठेवा
वास्तूप्रमाणे झोपण्याचे नियम
अधोरेखित-आमच्या विषयी
हजारो सर्पांना पकडून जीवदान देणारा बजरंग !
दक्षिणमुखी घर अशुभ ?
वाचकांचा निःपक्ष व निर्भीड आवाज ‘अधोरेखित ‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर. या संकेतस्थळाच्या माध्यमातून अगदी ग्रामीण स्तरापासून ते देशविदेशातील ताज्या घडामोडी,महत्त्वाच्या बातम्या,बातमीमागची बातमी, ब्रेकिंग न्यूज वाचकांपर्यंत नि:पक्ष व निर्भीडपणे…!
‘अधोरेखित’ हे facebook Page like 👍 करा
👇👇👇👇
https://www.facebook.com/अधोरेखित-104451631278927/