धावपळीच्या आणि कामकाजाच्या जगात प्रत्येक घरात एक तरी वाहन हे असते.वाहन हि अन्न,वस्त्र, निवाऱ्या प्रमाणे एक गरज बनली आहे.बऱ्याच जाणांना पेट्रोल-डिझेल गाड्यांमध्ये नेमका काय फरक असतो हे समजत नाही.पंपावरील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे किंवा तुमच्याकडूनच चुकून कधी गाडीमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल किंवा डिझेलऐवजी पेट्रोल टाकले तर काय होईल? ही चूक खूप छोटी वाटत असली तरी तुमच्या कारसाठी ती खूप धोकादायक आहे.
अनेकदा पेट्रोल पंपावरही अशी चूक होते.त्यामुळे तुमच्यासोबतही असे होऊ शकते.असे झाल्यास,दुर्लक्ष अजिबात करू नका,अन्यथा तुमचे व कारचेही खूप नुकसान होऊ शकते.त्यामुळे काही वेळा चुकीने पेट्रोलच्या गाडीच डिझेल तर डिझेलच्या गाडीचत पेट्रोल भरले जाते.त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या गाडीत काय फरक आहे? आणि पेट्रोलच्या गाडीत डिझेल व डिझेलच्या गाडीत पेट्रोल टाकले तर काय करावे? यासाठी ही माहिती…
पेट्रोल-डिझेलची गाडी कशी ओळखाल?
- पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे इंजिनमध्ये फरक आहे.
- पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये गाडी चालू करण्यासाठी स्पार्किंग प्लग असतात तर डिझेल गाड्यांमध्ये फ्युएल इन्जेक्टर असतात.
- तसेच डिझेल हे पेट्रोलपेक्षा जड असते,तर पेट्रोल डिझेलपेक्षा अधिक ज्वलनशील असते.
पेट्रोल ऐवजी डिझेल टाकले तर काय?
मुख्यतः पेट्रोल गाड्यांचे आणि डिझेल गाड्यांचे इंजिन वेगवेगळे असते. पेट्रोल गाड्यांमध्ये गाडी चालू करण्यासाठी स्पार्किंग प्लग असतात तर डिझेल गाड्यांमध्ये फ्युएल इन्जेक्टर असतात. डिझेल हे पेट्रोलपेक्षा जड असते.
- आपल्या दुचाकी वाहनामध्ये तुम्ही जर चुकून पेट्रोल ऐवजी डिझेल भरले, तर त्वरित गाडीच्या इंधनाची टाकी रिकामी करा.
- त्यानंतर इंधनाचा पाईप आणि कार्बोरेटर स्वच्छ करावा.
- तुम्ही जर तसेच डिझेलवर दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केला गाडी चालू होणार नाही आणि झालीच तर इंजिनवर जोर पडून इंजिनातून मोठा आवाज येईल. मोठ्या प्रमाणावर धूर येईल
- इतकेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर धूर देखील येणास सुरुवात होईल आणि गाडीचे गॅस्केट जळून जाईल. शेवटी गाडीचे इंजिन निकामी होऊ शकते.
- इंजिन गरम होऊन निकामी देखील होऊ शकते.
डिझेल ऐवजी पेट्रोल टाकले तर काय?
तुमच्याकडे डिझेलची गाडी असेल आणि त्यात चुकून पेट्रोल टाकले असेल, तर ते खूप चिंताजनक आहे.डिझेल गाडीमध्ये चुकून पेट्रोल भरल्यानंतर आपल्याला लगेचच त्याचा अंदाज येत नाही. पेट्रोल हे डिझेलपेक्षा अधिक ज्वलनशील असते. त्यामुळे ते लगेचच पेट घेते आणि गाडी लगेच चालू होते. परंतु काही अंतर गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की गाडीमध्ये चुकीचे इंधन भरले गेले आहे.अशावेळी घाबरुन जाऊ नये.
- सर्वात आधी गाडी बंद करा त्यानंतर मेकॅनिकला बोलवून त्याच्या मदतीने इंधनाची टाकी साफ करून घ्या.
- तसेच इंजिनाच्या ज्या ज्या भागात पेट्रोल गेले असेल त्या सर्व जागा ड्रेन करून घ्याव्यात.अशाने गाडीच्या इंजिनाचे कोणतेही नुकसान होत नाही.
पाणी भरल्यास काय …
- जर तुमच्या वाहनात इंधनाऐवजी पाणी आढळले असेल तर ते पूर्णपणे भेसळीचे प्रकरण आहे आणि इंधन स्टेशनची चूक आहे.
- वाहन सुरू करण्यापूर्वी ते आढळल्यास, वाहन अजिबात सुरू करू नका.चुकून गाडी स्टार्ट केली तर इंजिन फ्रीज होऊन संपूर्ण इंजिन खोलावे लागेल.
- कार मेकॅनिककडे ढकलत घेऊन जा किंवा RSA ला कॉल करा.
- मेकॅनिककडे गेल्यावर सॅम्पलसाठी टाकीतील इंधन बाटलीत भरा.
- इंधन स्टेशनकडून नुकसानभरपाईचा दावा करा,नकार दिल्यास,पोलिसांची मदत घ्या.
- इंधन भरल्यानंतर,त्याची स्लिप किंवा पावती घेतल्याची खात्री करा,जेणेकरून तुम्हाला दावा करणे सोपे जाईल.पेट्रोल पंपावर ऑनलाइन पैसे भरण्याचा प्रयत्न करा.