छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त ५० वर्षे आयुष्य मिळाले. पण त्यांनी केलेल्या पराक्रमाची नोंद बखरकार,इतिहासकार, समकालीन राज्यकर्ते यांनी घेतली आहे.वैक्तिक पराक्रम, धाडस यांच्या बरोबरीने लोकशाही ही संकल्पना अस्तित्वत नसताना देखील शिवाजी महाराज रयतेच्य हितासाठी कल्याणकारी राजवट राबवित होते.शेती, प्रशासन,महसूल, संरक्षण,या सर्व आघाड्यावर त्यांनी नवी लोकाभिमुख व्यवस्था निर्माण केली.त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर साडे तीनशे वर्षांनी देखील ते आपले प्रेरणा स्थान आहेत शिव चरित्र मांडणीचे अनेक प्रवाह उदयाला आले प्रस्थापित झाले.
छत्रपती शिवाजी महाराज ही मराठी माणसाची अस्मिता आणि मानबिंदू होय. त्यांनी मराठी माणसाला लढायला शिकवले. निष्ठा, शौर्य, प्रामाणिकपणा हे गुण त्यानी आपल्या प्रजेत विकसित केले. पोवाडे, नाटक, चरित्र, व्यख्याने या माध्यमातून आणि मौखिक परंपरेतून शिव चरित्र गेली साडे तीनशे वर्षे मराठी मनावर गारुड करते आहे
या शिवचरित्र मांडणीचे आपल्या राज्यात चार मुख्य प्रवाह आहेत या मध्यवर्ती प्रवाहांचा वेध घेणारा हा व्हिडिओ पहा
मराठी शिवचरित्राचा इंग्रजी अनुवाद करण्यासाठी अनुवादकाला चक्क शंभर तोळे सोने मानधन म्हणून देण्याचा प्रकार मराठी साहित्य व्यवहारात घडला आहे. कुणी केला हा अनुवाद? कुणी दिलं शंभर तोळे सोनं? या प्रश्नांच्या उत्तरासाठी हा व्हिडीओ पाहा…