डोळ्यांमधील जळजळ,शुष्कपणा ग्लुकोमाचा त्रास किंवा लहान सहान समस्या असोत ! या सार्यावर प्रामुख्याने आयाड्रॉप्सचा सल्ला दिला जातो.मात्र अनेकदा चूकीच्या पद्धतीने घातलेले आय ड्रॉप्स तुमचा त्रास अधिक वाढवतात किंवा समस्येवर काहीच फारसा परिणाम दाखवत नाहीत.म्हणूनच डोळ्यात ड्रॉप्स घालताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.आयड्रॉप्सचा अतिवापर करणे योग्य नाही. यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो.योग्य प्रमाणात आयड्रॉप वापरल्यास ते फायदेशीर ठरू शकते.
मात्र अनेकदा चूकीच्या पद्धतीने घातलेले आय ड्रॉप्स तुमचा त्रास अधिक वाढवतात किंवा समस्येवर फारसा परिणाम दाखवत नाहीत.
- आयड्रॉप्स डोळ्यात घालण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा.
- आयड्रॉप्स घालण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट तपासून पहा.
- काही आयड्रॉप्सच्या बाटल्या उघडल्यानंतर केवळ महिनाभर वापरणं सुरक्षित असतात. अशावेळी त्या केव्हा उघडल्या आहेत त्या तारखेची नोंदणी करून ठेवा.
- आयड्रॉप्स पुरेशा प्रमाणात पडण्यासाठी बाटली वापरण्याआधी हलवून घ्या
- ड्रॉप घालताना मान मागे करून डोळ्याच्या खालची पापणी हलकीच खेचून त्यात 1-2 थेंब ड्रॉप घाला.
- ड्रॉप घातल्यानंतर नाकाजवळील भाग दाबू नका. यामुळे ड्रॉप नाकातून घशात जाणार नाही.
- ड्रॉप्स घातल्यानंतर किमान 10 सेकंद डोळे बंद ठेवा. त्यानंतर काही वेळ त्याची उघडझाप करा. दृष्टी स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करा.
- दोन प्रकारचे ड्रॉप्स डोळ्यात घालणार असाल तर त्यामध्ये 10-15 मिनिटांचे अंतर ठेवा.
- तुम्ही आयड्रॉप्स आणि आय ऑईनमेंट लावणार असाल तर आधी आयड्रॉप्स घाला त्यानंतर ऑईनमेंट लावा. तसेच पुढच्या ड्रॉपची गरज भासल्यास 2 तासांनी डोळ्यांत घाला.
- दिवसभरात कोणत्या डोळ्यात कोणता ड्रॉप घालताय याची नोंदणी ठेवा.
(टीप : या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/सामग्रीची अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी ‘अधोरेखित’ देत नाही.ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे,त्याच्या वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी.याव्यतिरिक्त,कृपया त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा)