शास्त्राप्रमाणे झोपण्याचेही काही नियम आहे. या नियमांप्रमाणे झोप घेतली तर शरीराला पूर्ण आराम मिळतो आणि मन प्रसन्न राहतं…
1. सदैव पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपले पाहिजे. उत्तर किंवा पश्चिमीकडे डोके ठेवून झोपणे योग्य नाही.
3. बांबू किंवा पलाशच्या लाकडाने बनलेल्या पलंगावर झोपू नये. डोके खालील बाजूला लटकवून झोपणेही योग्य नाही.
4. झोपण्यापूर्वी कपाळावरून टिळा आणि केसातून फुलं काढायला हवे.
झोपेशी संबंधित महत्वाच्या गोष्टी
झोपेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे. म्हणून ऋषी-मुनींनी झोपेसाठी काही नियम बनवले आहेत. शास्त्रानुसार संध्याकाळी झोपू नये.
निरोगी आरोग्यासाठी, झोपेच्या दोन तास आधी अन्न खावे. जेणेकरून पोटाच्या समस्या दूर राहतात.
तातडीची कामे नसल्यास रात्री उशीरापर्यंत जागू नये.
झोपेच्या आधी मन शांत ठेवा आणि देवाचे ध्यान करा.
(टीपः या लेखात दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे.कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही, ‘अधोरेखित’ याची पुष्टी करत नाही)