बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत
दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत
पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला,तर दहावीची परीक्षा 2 मार्चला सुरू होणार आहे.
फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि 12वीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेराज्य मंडळाने जाहीर केलेले सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मंडळाच्या वेबसाईटवरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य वेबसाईटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.
दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक :
तपशील : लेखी परीक्षेचा कालावधी
बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023
दहावी : 2 मार्च ते 25 मार्च 2023
दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहण्यासाठी बोर्डाच्या mahahsc.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्द करुन देण्यात आले आहे.
SSC FEB -2023 TIME TABLE TENTATIVE
HSC GENERAL FEB -2023 TIME TABLE TENTATIV
HSC VOCATIONAL FEB -2023 TIME TABLE TENTATIVE