देशात महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसह सर्वच विभागांचे मोठे योगदान आहे. सहकाराचे जाळे, राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, शेती, उद्योग, वैद्यकीय, अध्यात्म, सांस्कृतिक अशा सर्वच आघाड्यांवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा अनेक दिग्गजांनी उमटवला आहे. राज्यात प्रसिद्धी माध्यमांचे महत्व तितकेच आहे. प्रसार माध्यमांच्या कक्षा या वेगाने रुंदावत आहेत.सोशल मीडियाच्या जमान्यात बहुतांश प्रसिद्धी माध्यमांनी प्रिंट माध्यमाबरोबरच सोशल मीडियात आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. आम्हीही Online न्यूज पोर्टलच्या माध्यमातून या क्षेत्रात उतरलो आहोत.
‘अधोरेखित’ या साप्ताहिक प्रिंट माध्यमाबरोबरच’अधोरेखित’ हे Online न्यूज पोर्टल सुरू केले आहे. त्याचबरोबर फेसबुक पेजच्या माध्यमातून उपलब्ध आहोत.अँड्रॉइड ॲप, युट्युब चॅनेल हे पुढील टप्पे असणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणासमोर येताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. राजकीय घडामोडींचे वस्तुनिष्ठ व सडेतोड विश्लेषण, वाचनीय बातम्या, अभ्यासपूर्ण लेख, दर्जेदार साहित्याचे मिश्रण यासह समाजातील सर्व प्रश्नांना न्याय देण्याचा एक राजमार्ग म्हणून याकडे बघितले जाईल, असा आम्हाला विश्वास आहे.
असे असेल अंतरंग
✪ महत्त्वाची राजकीय कव्हरस्टोरी
✪ बातमीमागची बातमी! (केवळ बातमी न छापता त्या बातमीच्या मुळापर्यंत जाऊन केलेले वृत्तांकन व त्याचे सडेतोड विश्लेषण)
✪ राज्यातील,जिल्ह्यातील एखादा प्रभावी,विषय,घोटाळा,पडद्यामागच्या घडामोडी,स्फोटक न्यूज
✪ गाव,तालुका,जिल्हा,राज्य,देश-विदेशातील चालू घडामोडी
✪ सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित सर्व मुद्यांना न्याय
✪ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे व अन्यायाला वाचा फोडण्याचे काम
✪ अध्यात्मिक व योगा संबंधीचे तज्ज्ञांचे लेख व माहिती
✪ शासनाच्या विविध योजना व विविध आदेश
✪ शेतीपूरक प्रक्रिया उद्योग माहिती
✪ छोटा पडदा तसेच क्रीडा क्षेत्रातील घडामोडी
व्यापारी,उद्योजक,कर सल्लागार,कर दाते,दिवाणजी,सी.ए,सहकारी संस्था,पतसंस्था,कर अधिकारी आदींसाठी उपयुक्त माहिती यामध्ये असणार आहे.करविषयक व व्यापारी वर्गास उपयुक्त अशी कायद्याची माहिती,आयकर कायदा,सर्विस टॅक्स कायदा,मध्यवर्ती विक्रीकर कायदा,शॉपअॅक्ट,भेसळ प्रतिबंधक कायदा,व्यवसायिक कर व अन्य कर विषयक कायदे,व्यापारी कायदे यात झालेले बदल आणि झालेल्या नवीन दुरुस्ती यांची माहिती असणार आहे.
कर विषयक कायदे व कायद्यातील महत्त्वाची परिपत्रके
उद्योग आणि व्यापार व्यवस्थापन अर्थशास्त्र या विषयावरील तज्ज्ञांचे लेख
व्यवस्थापन,विक्रीकला,जमाखर्च आधी संबंधित लेख
व्यापार-उद्योगातील व्यक्तींच्या यशोगाथा
➦ आणि हो…थोडासा विरंगुळा म्हणून विनोद,सुविचार,शब्दकोडे,जिज्ञासा,भटकंती,राशिभविष्य हाही खजिना असणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आम्ही समाजातील सर्व घटकांना या माध्यमातून सहभागी करून घेत आहोतच.सोशल मीडियाच्या माध्यमातून एका ‘क्लिक’वर लाखो लोकांपर्यंत आम्ही आपल्या सहकार्याने पोहोचणार आहोत असा आम्हाला विश्वास आहे.सर्वच क्षेत्राला सर्वंकष न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील.यासाठी अर्थात आपली साथही तितकीच लाखमोलाची ठरणार आहे.आमच्या वाटचालीत आपले योगदान हे अर्थातच महत्वपूर्ण असणार आहे.
संपादक,
अधोरेखित मीडिया नेटवर्क अँड मार्केटींग
PUBLISHER : SANJAY PATIL
संपर्क : शॉप नं.-१६/१७,मा.जयंत पाटील खुले नाट्यगृह शॉपिंग सेंटर,ताकारी रोड,इस्लामपूर
ता.-वाळवा,जि.-सांगली (महाराष्ट्र)
Contact : Shop No-16/17,Hon.Jayant Patil khule Natyagruh shopping centre,Takari Road,Islampur,Tal-Walwa,Dist-Sangli (Maharashtra)
Email ID : adhorekhit999@gmail.com