मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परिक्षेचा निकाल आज, मंगळवारी जाहीर केला जाणार आहे. हा निकाल विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे.राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता हा निकाल घोषित केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता येत्या 21 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. हा निकाल पाहिल्यानंतर लगेचच निकालाची प्रिंटही घेता येणार आहे.
दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल.
डिजीलॉकर मध्ये गुणपत्रिका संग्रहीत करता येणार
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा
निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
१. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
२. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा.
३. आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
४. यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
५. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
या साईटवर जाऊन विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात.
1) mahresult.nic.in
2) mahahsscboard.in
3) hsc.mahresults.org.in
4) hscresult.mkcl.org