मागील प्रश्नांत आपण वास्तु म्हणजे काय हे छान समजावून सांगितलं,तर माझा आता असा प्रश्न आहे,
प्रश्न २
भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा ?
उत्तर
फारच छान प्रश्न विचारलात,
वास्तुरत्नावली या ग्रंथात, भूपरिग्रहाध्यायात,राजा भोज म्हणतात,
आयते सिद्धयस्सर्वाश्चतुरस्रे धनागम:।
वृत्ते तु बुद्धिवृद्धी:स्याद्भद्रं भद्रासने भवेत्॥४९
आयताकार क्षेत्र म्हणजे समोरासमोरील भुजा व चारी कोनांमध्ये समान असणार्या भूमीवर निवास करण्याने सर्व सिध्दी होते तर चतुरस्त्र म्हणजे लांबी रुंदी समान असणार्या भूमीवर निवास केल्याने आर्थिक आवक वाढते .
यावरून लक्षात येते,
वास्तुशास्त्रात चौरस व आयताकार वास्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मग ती राहण्यासाठी असो किंवा व्यवसायासाठी, म्हणून शक्यतो चौरस,आयाताकृती वास्तुची निवड करावी.
कारण चौरस आयाताकृती भूमीमध्ये बांधकाम करत असतानाही काटछाट करावी लागत नसल्यामुळे व्यावसायिक नुकसान थांबते हा ही शास्त्रीय दृष्टीकोन असावा.
समरांगणसूत्रधार या वास्तुशास्त्राच्या ग्रंथात, चाळीस प्रकारचे आकार सांगितलेले आहेत आणि कोणत्या आकाराचा प्लॉट कोणत्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल हेही सांगितले.
उदाहरणार्थ सेनापती, लष्कर अधिकारी, सैन्य दलाचा प्रमुख अशा व्यक्तींसाठी गोलाकार भूमी शुभ सांगितली आहे.
यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळे फलित सांगितले आहे.पण त्रिकोणनी आकाराचा प्लॉट मात्र सगळ्यात अशुभ सांगितला आहे.
विश्वकर्मा प्रकाश गंथांमध्ये,चौकोनी आयताकार ,गोल, बैल ,घोडा, त्रिशूल, लिंग ,झेंडा व सिंह या आकाराची वास्तु शुभ सांगितली आहे.
उंट, मनुष्य, बकरी ,डुक्कर, कावळा अजगर, गाढव ,बेडूक ,साप ‘चिमटा धान्य पाखडणे सुप, गाडीचा आकार त्रिकोनी इ.सर्व आकाराची भूमी अशुभ सांगितलेली आहे .
थोडक्यात सर्वच ग्रंथकर्त्यांचे आयात आणि चौरस वास्तूच्या बाबतीत एकमत आहे,त्यामुळे घरासाठी किंवा व्यवसायासाठी वास्तू निवडताना चौरस किंवा आयताकृती निवडावी.
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
प्रश्न ३
मागील प्रश्नात आकाराच्या बाबतीत विस्तृत वर्णन केले,पण माझा आता असा प्रश्न आहे की,भूमीचा उतार अर्थात प्लव कोणत्या दिशेस असावा ?
उत्तर
भूमीप्लव किंवा उताराच्या संदर्भात विश्वकर्माप्रकाश
या ग्रंथात फारच छान विवेचन केलेले आहे .
पूर्वप्लवे भवेल्लक्ष्मीराग्नेय्यां शोकमादिशेत्।
याम्यं यमद्वारं नैऋते च महाभयम्।
पश्चिमे कलहं कुर्याद्वायव्यां मृत्युमादिशेत्।
उत्तरे वंशवृद्धी:स्यादीशान्ये रत्न संञ्चय:॥
ज्या भूमीचा उतार पूर्वेकडेआहे ती लक्ष्मीकारक समजावी.
आग्नेयेकडे उतार असल्यास शोककारक’ दक्षिणेकडे मृत्यू कारक, नैऋत्येकडे महाभय पश्चिमेस कलह,वायव्येस मृत्यू कारक ,उत्तरेस वंशवृद्धी ईशान्येस रत्न लाभ .
अर्थात पूर्वेकडे ईशान्येकडे आणि उत्तरेकडे भूमी उतार असावा.
यामध्ये नैसर्गिक उताराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही बाब आवर्जून सांगावीशी वाटते.
मनुष्यलय चंद्रिका अध्याय एक श्लोक एकोणीस मध्ये पूर्वेचा उतार समृद्धीदायक, उत्तरेचा उतार धनदायी, आणि ईशान्येचा उतार शुभदायक सांगितलाआहे.
तसेच मयमतम,मानसारम,अपराजितपृच्छा इत्यादी मान्यताप्राप्त ग्रंथातही पूर्व,उत्तर ,ईशान्य हा उतार (प्लव)शुभप्रद सांगितलेला आहे.
म्हणून,वास्तूचा (भूमीचा) उतार- उत्तर ईशान्य आणि पूर्व या दिशेस असावा.
क्रमशः
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री) मो.९८६०८२५९९३
ज्योतिष वास्तू डाऊझिंग आणि योग सल्लागार
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक
योग शिक्षक-योग गुरुकुल,नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि.सांगली
भाग १ :
वास्तु म्हणजे काय ?
हेही वाचा…
बी–बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई–मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप‘चा विळखा होतोय घट्ट
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष । राज्यात दिवसाढवळ्या दरोडा ?
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी !
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित’ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर.
दीपोत्सव 2021-माझी संस्कृती…माझा अभिमान
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित’ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर…!
ताज्या बातम्या,नोकरी अपडेट्स,माहितीचा खजिना मिळविण्यासाठी जॉईन व्हा…!
https://chat.whatsapp.com/GBANKcK4KlR9ymjY579u1z
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
वयोवृद्धाच्या अभंगाने प्रांताधिकारी भारावले
तुमचे नशीब बदलू शकते,घराच्या भिंतीवरचे घड्याळ लावताना ‘हे’ लक्षात ठेवा
वास्तूप्रमाणे झोपण्याचे नियम
अधोरेखित-आमच्या विषयी
हजारो सर्पांना पकडून जीवदान देणारा बजरंग !
दक्षिणमुखी घर अशुभ ?
वाचकांचा निःपक्ष व निर्भीड आवाज ‘अधोरेखित ‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर. या संकेतस्थळाच्या माध्यमातून अगदी ग्रामीण स्तरापासून ते देशविदेशातील ताज्या घडामोडी,महत्त्वाच्या बातम्या,बातमीमागची बातमी, ब्रेकिंग न्यूज वाचकांपर्यंत नि:पक्ष व निर्भीडपणे…!
‘अधोरेखित’ हे facebook Page like 👍 करा
👇👇👇👇
https://www.facebook.com/अधोरेखित-104451631278927/