हायलाइट्स :
✪ सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळण्याचे वाढते प्रकार
✪ या विळख्यात उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्ती व तरुणाईचा समावेश
✪ समाजात आपली बदनामी होईल म्हणून असे अनेक प्रकार उघडकीस नाहीत येत
✪ पहिल्या वर्ल्ड वॉरपासून ते सोशल मीडियापर्यंत हनी ट्रॅपचा वापर
✪ बदनामीच्या भीतीने काहींनी केल्या आत्महत्या
पुणे ।
दिवसेंदिवस ‘हनी ट्रॅप’चा विळखा घट्ट होत चालला आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या उच्चपदावरील व्यक्तीशी किंवा तरुणांशी शरीर सुखाचे प्रलोभन दाखवून जवळीक साधून त्यांनी केलेल्या कृत्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करून लाखों रुपये उकळण्याचे प्रकार घडत आहेत.या ट्रॅपच्या विळख्यात उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्ती व तरुणाई ओढली जात आहे.मात्र,समाजात आपली बदनामी होईल म्हणून असे अनेक प्रकार उघडकीस येत नाहीत.हनी ट्रॅपला बळी पडलेल्या काहींनी तर बदनामीच्या भीतीने आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात मध्यंतरी एका महिन्यात हनी ट्रॅपच्या त्रासाला कंटाळून दोन तरुणांनी आपले जीवन संपविले.हनीट्रॅपमुळे कोल्हापूरमध्ये एका कापड व्यापारी तरुणाला अडीच लाख रुपयाला गंडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी कोल्हापुरात उघडकीला आला आहे.युवतीसह टोळीच्या दहशतीला घाबरून तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी दिल्याने व्यापाऱ्याने दोन दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.मात्र नातेवाईक आणि पोलीसांच्या सर्तकेतेेमुळे तरूणाचा जीव वाचला आहे.तसेच कोल्हापूर येथील आणखी एका व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून साडेतीन कोटींची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने भांडाफोड केला आहे.मध्यंतरी एक क्लासवन अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये फसला होता.
हेही वाचा…
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राजकारण,कॉर्पोरेट,फॅशन,मनोरंजन,गुप्तचर यंत्रणा,लष्कर,खेळ आदी सगळ्याच क्षेत्रात हनी ट्रॅपचा विळखा वाढत आहे.गोपनीय माहिती मिळवून आपला फायदा करण्यासाठी किंवा समोरच्यावर वार करण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर होत आहे.हनी ट्रॅपमध्ये ट्रॅप अर्थात सापळा टाकण्यासाठी महिलांचाच सर्वाधिक वापर होत आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या उच्चपदावरील व्यक्तीशी किंवा तरुणांशी शरीर सुखाचे प्रलोभन दाखवून जवळीक साधून त्यांनी केलेल्या कृत्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करून लाखों रुपये उकळण्याचे प्रकार घडत आहेत.काही हजारांपासून कोटीत आकडे पुढे येत आहेत.तरुणाईमध्ये फेसबुक,व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हनी ट्रॅप पसरवला जात आहेत आणि याचा मानसिक व आर्थिक फटका तरुणाईला बसत आहे. आपल्या एका चुकीमुळे तरुणाईला नाहक मनस्तापातून जावे लागत आहे.
हनी ट्रॅपची खरी सुरुवात एखाद्या चांगल्या डीपी असलेल्या मुलीचा किंवा मुलाचा मेसेज अचानक येण्यातून हाेते.स्वत:विषयी अतिशय जुजबी माहिती देऊन गप्पा सुरू होतात.मग हळूहळू सलगी वाढवत साध्या चॅटिंगचे रूपांतर अश्लील संभाषणात होते.कुठले तरी न्यूड फोटो पाठवून ते आपले असल्याचे भासवत तुम्हालाही प्रवृत्त केले जाते.एखाद्याने हे फोटो पाठविले किंवा नुसता प्रतिसाद दिला तरी नकळत हनी ट्रॅपमध्ये ओढला जातो.मग सुरुवात होताे मानसिक छळ,खंडणीची मागणी आणि ब्लॅकमेलिंगयातून पुढे गंभीर गुन्हेही घडत जातात.या ट्रॅपची मोठ्या प्रमाणात सुरुवात व्हॉट्सअॅपवर होताना दिसते.त्यामुळे यूजरना या धोक्याची पूर्वकल्पना असणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.पहिल्या वर्ल्ड वॉरपासून ते सोशल मीडियापर्यंत हनी ट्रॅपचा वापर होत आहे.
हनी ट्रॅप-इतिहास आणि बदलते स्वरूप
हनी ट्रॅप म्हणजे
एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात. या पद्धतीला जगभरात सर्वत्र हजारो वर्षांचा इतिहास आहे.(विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवण्यात आले होते.हाही पुराणातला ‘हनी ट्रॅप’च) गुप्तहेरांपेक्षा हे काम प्रभावी मानले जाते.दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘हनी ट्रॅप’ खूप गाजले होते. मॅच फिक्सिंग प्रकरणात बुकींकडून असा ‘हनी ट्रॅप’ लावल्याचे नुकतेच समोर आले होते. मंत्री, व्यावसायिक,खेळाडू या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत.नेते,आयएएस अधिकारी,इंजिनिअर,व्यापारी,नेते,पत्रकार यासर्वांना हनी ट्रॅपमध्ये फसवल्याची अनेक उदाहरण सापडतील.
इतिहास काय सांगतो ?
‘हनी ट्रॅप’ हा प्रकार नवा नाही.याचे काही दाखले आपल्याला पुराणातही मिळतात महायुद्धांच्या काळातही शत्रू राष्ट्राची माहिती काढून घेण्यासाठी परस्परांविरोधात ‘हनी ट्रॅप’ लावले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.प्रत्येक क्षेत्रात अशी उदाहरणे बघायला मिळतात.राजकारण,कॉर्पोरेट,क्रीडा सर्वच क्षेत्रांमध्ये कधी ना कधी याचा वापर होत आला आहे.
स्वरूप बदलले ?
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘हनी ट्रॅप’च स्वरूप बदलले आहे. पूर्वी ‘हनी ट्रॅप’ लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत असे.आता मात्र फेसबुक,व्हॉट्सअॅप,हाइक,वी चॅट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सावज हेरले जाते व अनेकदा प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते किंवा त्याला जाळ्यात अडकवले जाते.उदा.न्यूड फोटो पाठवून ते आपले असल्याची खात्री समोरच्याला पटवली जाते.त्याची खात्री पटली की त्यालाही तसे फोटो पाठवण्यास सांगितले जाते.एखाद्याने हे फोटो पाठवले की मग तो अलगद या ‘ट्रॅप’मध्ये सापडतो.
असा लावला जातो ‘ट्रॅप’
सध्या हनी ट्रॅप चा ट्रेंड बदलला आहे.एखाद्याचा क्रमांक शोधून त्यावर जुजबी माहिती देणारा पहिला मेसेज टाकला जातो.तो मेसेज बघितला किंवा त्याला प्रतिसाद दिला की गोड बोलून त्याच्याकडून अधिक माहिती काढून घेतली जाते.वारंवार संवाद साधल्यानंतर अश्लील संवाद सुरू होतो.संवाद सुरू झाल्यानंतर शारीरिक संदर्भातील व्हिडिओ संवाद सुरू होतो आणि याचाच फायदा घेऊन स्क्रीन रेकॉर्ड केले जाते.इथून खेळ सुरू होतो पैसे देवाण-घेवाणीचा.जर मला अमुक-तमुक रक्कम नाही दिली तर मी तुझे हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करुन बदनामी करण्याचा धमकी दिली जाते.तरुण या मोह जाळ्यात अडकून बदनामी वाचवण्यासाठी पैसे देतो.जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर तरुण आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय निवडत नाही.
सावधगिरी कशी बाळगाल
आताच्या जमान्यात कोण कसा ‘ट्रॅप’ लावेल सांगता येत नाही.त्यामुळेच अनोळखी व्यक्तींशी एका मर्यादेच्या पलीकडे चॅट करण्याच्या मोहात पडू नका. वैयक्तिक माहिती पाठवू नका.कुणी सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा.अनोळखी व्यक्तीचा मेसेज आल्यानंतर शहानिशा केल्याशिवाय त्याला आपली माहिती देऊ नका.सोशल मीडियावर स्वतःबद्दल किंवा कुटुबियांबद्दलची माहिती टाकताना विचार करावा.तरीही फसवणूक झालीच तर तरुणांनी अशा घटना घडल्यानंतर कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता,निसंकोचपणे वेळेचा विलंब न करता सायबर सेलकडे तक्रार द्यावी व संपूर्ण पोलीस प्रशासन आपल्याला तत्परतेने मदत करू शकते.
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी–बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई–मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा !
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष । राज्यात दिवसाढवळ्या दरोडा ?
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी !
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन‘ मराठी पेपर.
दीपोत्सव 2021-माझी संस्कृती…माझा अभिमान
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन‘ मराठी पेपर…!
ताज्या बातम्या,नोकरी अपडेट्स,माहितीचा खजिना मिळविण्यासाठी जॉईन व्हा…!
https://chat.whatsapp.com/GBANKcK4KlR9ymjY579u1z
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
वयोवृद्धाच्या अभंगाने प्रांताधिकारी भारावले
तुमचे नशीब बदलू शकते,घराच्या भिंतीवरचे घड्याळ लावताना ‘हे‘ लक्षात ठेवा
वास्तूप्रमाणे झोपण्याचे नियम
अधोरेखित–आमच्या विषयी
हजारो सर्पांना पकडून जीवदान देणारा बजरंग !
दक्षिणमुखी घर अशुभ ?