जगातील ‘या’ हॉटेलमध्ये फक्त मांजरांचा रहिवास; त्याचे भाडे आहे लाखात
एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे, ‘हर कुत्ते का दिन आता है !’ पण, जगातील असे एक ठिकाण आहे तेथे मांजरांसाठी अच्छे दिन आहेत.
आजपर्यंत तुम्ही माणसांसाठी 3 स्टार, 5 स्टार, 7 स्टार हॉटेलबद्दल ऐकले असेल.या महागड्या आणि आलिशान हॉटेल्समध्ये लोकांना एकाहून एक सरस सुविधा मिळतात.पण तुम्ही कधी अशा हॉटेलबद्दल किंवा हॉटेलच्या अशा कोणत्याही योजनेबद्दल ऐकले आहे जे फक्त मांजरांसाठी आहे ? हे विचित्र वाटेल पण या जगात मांजरांसाठी स्वतंत्र हॉटेलची सोय आहे हे खरे आहे.
पण या हॉटेलमध्येही सामान्य हॉटेलप्रमाणेच जागांची चढाओढ पाहायला मिळते. मांजरांच्या या हॉटेलला इतकी मागणी आहे की तिथे खोल्या मिळत नाहीत.सर्व खोल्यांचे बुकिंग भरले आहे.एवढेच नाही तर या हॉटेलमध्ये कोणीही फुकटात राहत नाही,तर त्याचे भाडेही लाखो रुपये आहे.
हे खास हॉटेल पॅरिसमध्ये आहे आणि या हॉटेलचे नाव आहे कॅट्स ट्री हॉटेल.येथे येणारे लोक आपल्या पाळीव मांजरीला या खास ठिकाणी सोडून शहरात फिरायला जातात.या सुविधेसाठी एक संपूर्ण हॉटेल आहे.हे हॉटेल इतके लोकप्रिय आहे की केवळ या वर्षीच नाही तर पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२३ अखेरपर्यंत बुकिंग फुल्ल झाले आहे.लोक इथे बुकींग करण्याचा खूप प्रयत्न करत आहेत पण ते मिळत नाही.
ही आहेत या हॉटेलची वैशिष्टये
हे हॉटेल देखील खास आहे कारण इथे मांजरांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात.येथे मांजरांना स्वतंत्र बेड आणि जेवण आणि पलंग आणि उपचार सुविधा देखील मिळतात.तसेच येथे मांजरी पूर्णपणे सुरक्षित असून लोक मांजर सोडून बाहेर फिरायला जातात.हॉटेलचे कर्मचारी आठवड्यातून दोनदा मांजरीचे छायाचित्र त्याच्या मालकाला पाठवतात त्यामुळेच या हॉटेलला मोठी मागणी आहे.मांजरींसाठी हे एकमेव हॉटेल आहे.