सांगली :
सांगली जिल्ह्यातील बहे येथील वारकरी संप्रदायातील वयोवृद्ध ह.भ.प.कोंडीबा गणू कांबळे यांनी गायलेल्या अभंगाने इस्लामपूरचे प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी हे भारावून गेले.प्रांताधिकारी डॉ.खिलारी हे बहे येथे गावभेटीवर असताना त्यांनी कोंडीबा कांबळे यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
प्रांताधिकारी डॉ.खिलारी हे मंगळवारी बहे येथे गावभेटीवर गेले होते.त्यावेळी ते गावचवडीत जात असताना त्यांना कोंडीबा कांबळे हे वयोवृद्ध दिसले.त्यांना पाहताच ते त्यांना कार्यालयात घेवून आले.त्यांनी जवळ बसवून घेत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
त्याचर्चेत कांबळे हे वारकरी संप्रदायातील असल्याचे समजताच त्यांनी एक अभंग म्हणण्याचा आग्रह कांबळे यांना केला.त्यावेळी कांबळे यांनी एक अभंग गायला.कांबळे यांच्या अभंग गायनाने डॉ.खिलारी चांगलेच भारावून गेले.आजोबा तब्येतीची काळजी घ्या,अशी आपलेपणाने भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान,प्रांताधिकारी डॉ.खिलारी यांचा ग्रामस्थांच्या वतीने राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील यांनी सत्कार केला.यावेळी मंडल अधिकारी तानाजी यादव,गावकामगार तलाठी अविनाश पाटील,ग्रामसेवक सागर खराडे,सदस्य मनोज पाटील,महादेव मोहिते,जालिंदर देशमुख,दिनकर पाटील,रोहित तोरस्कर,गणेश पाटील,विश्वास मुसळे,विष्णू थोरात,अरुण डुकरे,हेमंत सुर्यगंध आदी उपस्थित होते.दरम्यान,प्रांताधिकारी डॉ.खिलारी यांनी अचानक दिलेल्या गावभेटीत उपस्थित लोकांशी त्यांनी थेट संवाद साधला.उपस्थित शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले.
https://twitter.com/adhorekhit/status/1453404572605566977?t=hfjLYMUmoIFb4A6Li7OjpA&s=08
https://www.kooapp.com/koo/Adhorekhit/ca68ce0b-20f8-42a8-ba4a-46b4c1b470ed