Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला.शेतकरी, महिला, तरुण आणि करप्रणालीसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयांची त्यांनी घोषणा केली.या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. तसेच करात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यावेळी केंद्र सरकारने काही संकल्प केले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वेगळ्या दिशेने जात आहे. पारदर्शी सरकार हेच आमचं ध्येय आहे. भाषणाच्या सुरुवातीची 20 मिनिटे सीतारामन यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेतला.ही कामे कुठपर्यंत आली त्याची माहितीही दिली. त्यानंतर सीतारामन यांनी घोषणांचा पाऊस पाडला.
करप्रणाली जैसे थे…
टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.सध्या आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. आता 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही.
मागील वर्षी अशी होती कर रचना
मागील वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 7 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केले होते. त्यानंतर 8 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांना 35 हजार रुपये कर भरावा लागणार आहे. तर 9 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 45 हजार, 10 लाख उत्पन्नावर 60 हजार, 12 लाख उत्पन्नावर 90 हजार आणि 15 लाख उत्पन्नावर 1 लाख 50 हजार रुपये टॅक्स भरावा लागणार आहे. यावर्षी हा स्लॅब कायम आहे. त्यात कोणताही बदल केला नाही.
1 कोटी महिलांना बनवले लखपती दीदी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, लखपती दीदींना बढती दिली जाईल. पगार दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदींकडून स्वावलंबन आले आहे. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जाईल. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणखी दोन कोटी घरे बांधली जाणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे.आमच्या सरकारचे लक्ष पारदर्शक कारभारावर आहे.अर्थमंत्र्यांनी 20 मिनिटे केंद्र सरकारच्या योजनांची गणना केली आणि भारताच्या विकासाच्या गतीवर चर्चा केली. निर्मला म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील.
प्रत्येक महिन्याला 300 यूनिट वीज मोफत
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर आमचा भर असणार आहे.पिकांसाठी नॅनो डॅपचा वापर केला जाणार आहे.डेअरींचाही विकास केला जाणार आहे.दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.1361 मंडयांना ईनेमने जोडले जाणार आहे.याशिवाय मिशन इंद्रधनुषमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. 9 ते 14 वर्षाच्या मुलींना मोफत लस देण्यात येणार आहे.नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक महिन्याला 300 यूनिट वीज मोफत दिली जाणार आहे, अशी घोषणाही सीतारामन यांनी केली.
आशा सेविका,अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा
आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे.देशभरातील सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना आता आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे.गेल्या 10 वर्षांत महिला सक्षमीकरणावर भर, महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल, तिहेरी तलाक हा मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात 70 टक्के महिलांना घरे मिळाली, असे अर्थमंत्री सीतारामण यांनी सांगितले.
अर्थमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
- येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार
- गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी लसीकरण करणार आहे.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- मिशन इंद्रधनुषमध्ये लसीकरण वाढवण्यात येणार आहे.
- नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील. यासाठी समिती स्थापन करणार आहे.
- 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केले जाईल.
- नॅनो डीएपीचा वापर पिकांवर केला जाईल. दुग्धविकास क्षेत्रात चांगले काम होईल. दुग्ध उत्पादकांना प्रोत्साहन दिले जाईल.
- 1361 मंडई eName शी जोडल्या जातील. येत्या ५ वर्षांत विकासाची नवी व्याख्या तयार करू.
- आशा भगिनींनाही आयुष्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- तेलबियांवरील संशोधनाला चालना दिली जाईल.
- महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.