उद्या पेरणी म्हणताच शेतकरी आज बियाणे खरेदीला जातात. घाईगडबडीत सेवा चालक देतील ते बियाणे आणि देतील तीच पावती घेऊन ते परतीची वाट धरतात. मात्र, शेतकऱ्यांची येथेच मोठी चूक होती. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. खरिपपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आता वेध लागले आहेत ते चाढ्यावर मूठ ठेवण्याची.मात्र, उत्पादन वाढीसाठी आणि पेरलेलं उगवण्यासाठी शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरवातीपासूनच सतर्क असणे गरजेचे आहे. त्यामुळे खत, बी-बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरवर्षी पेरणी नंतर उगवलेच नाही किंवा उगवले तर फळधारणा झालीच नाही अशा एक ना अनेक तक्रारी कृषी विभागाकडे दाखल होतात.पण खत, बियाणांची खरेदी करताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे कृषी विभागालाही कारवाई करता येत नाही त्यामुळे सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी सतर्क राहिले तर त्याचा फायदा होणार आहे.त्यामुळे कृषी विभागाचे काय अवाहन आहे याचा प्रत्येक शेतकऱ्यांने अवलंब करणे गरजेचे आहे.
बियाण्याची स्वरेदी करताना घ्यावयाची काळजी
🌑 बनावट / भेसळयुक्त वियाणे खरेदी टाळण्यासाठी, अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करा.
🌑 पावतीवर वियाण्याचा संपुर्ण तपशिल जसे पीक, वाण, दर्जा संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपुर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी नमुद करावे.
🌑 वियानांचे वेष्टन / पिशवी, ढंग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
🌑 भेसळीची शंका दूर करण्यासाठी वियाणेची पाकीटे सिलबंद / मोहोरबंद असल्याची खात्री करावी.
🌑 खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी.
🌑 सोयाबीन बियाण्याची वाहतूक व हाताळणी यामध्ये इजा झाल्यास उगवन क्षमतेवर परिणाम होतो त्यामुळे दक्षता घ्यावी..
🌑 कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचा-यांशी संपर्क साधा.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा
कृषी निविष्ठा किंवा परवानाधारक विक्रेत्यांनी बियाणे विक्रीबाबत घ्यावयाची दक्षता
✪ बियाणे धावफलक दर्शनी भागात लावून त्यावर कंपनीनिहाय, जातीनिहाय विवाणे साठा व दर नमुद करावेत.
✪ सत्यतादर्शक बियाण्याच्या पिशवीवर एकच लेबल असल्याची खात्री करावी.लेबलवर दिशाभूल करणारा कोणताही मजकूर नसावा.
✪ बियाण्याची विक्री परवाना घेऊनच करावी. बियाणे खरेदीची पक्की पावती द्यावी. त्यावर वरील प्रमाणे सर्व मजकूर छावा
✪ बियाणे, खरेदी विक्रीचा मासिक अहवाल गटविकास अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांना नियमित सादर करावा.
✪ परवाना दिलेल्या ठिकाणीच बियाण्याची विक्री किंवा साठा करावा. बियाणे परवाना शेतकऱ्यास दिसेल अशा ठिकाणी लावावा.
✪ शेतकऱ्याची निविष्ठाबाबत फसवणूक होवू नये म्हणून अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ या कायद्यातर्गत थी बियाणे अधिनियम १९६८, बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ हे कायदे तयार करण्यात आले आहेत.