डोंगरांची चाळण…खाण माफिया सुसाट!
• प्रशासनाच्या नाकासमोर टिच्चुन कोटयावधी रूपयांच्या महसूलाला चुना !
• खाण माफिया व राजकीय नेते आणि अधिकारी यांच्यातील कथित अभद्र युती;तपासण्यांनाच सुरूंग
• तपासणी म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार : पारदर्शक तपासणीची गरज
पुणे/विशेष प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रातील दगडखाण माफियांनी त्या-त्या परिसरातील डोंगरटेकडयांना अक्षरशः पोखरून काढले आहे.गेल्या 10-15 वर्षात या खाणमाफियांनी शासनाच्या कोटयावधी रूपयांच्या महसूलाला चुना लावण्याबरोबरच त्याच्या कितीतरी अधिक पटीने गौण खनिजाची चोरी केली आहे. प्रशासनाच्या नाकासमोर टिच्चुन सुरु असलेला प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या टाकलेला एकप्रकारे दरोडाच म्हणावे लागेल.
राज्य शासनाने वेळोवेळी याची शहानिशा करण्याचा तपासणीच्या माध्यमातून प्रयोग केला;पण खाण माफिया व राजकीय नेते आणि अधिकारी यांच्यातील कथित अभद्र युतीने अनेकवेळा या तपासण्यांनाच सुरूंग लागल्याचे दिसून आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सांगली,सातारा,कोल्हापूर,पुणे,सोलापूर जिल्हयात मोठयाप्रमाणात डोंगर तसेच टेकडयांमध्ये शेकडो दगड खाणी आहेत. दरवर्षी अशा डोंगरटेकडयांतील खाणींमधून कोटयावधीं रूपयांचा दगड तसेच मुरूमाचे उत्खनन सुरू असते.पुणे जिल्हयात सुमारे 850 दगड खाणी आहेत. सांगली जिल्हयात 100 हून अधिक दगड खाणी आहेत.त्यात वाळवा तालुक्यातील खाणींची संख्या अधिक आहे. कोल्हापूर जिल्हयातही मोठयाप्रमाणात दगड खाणी आहेत. दगडमुरूम उत्खननासाठी महसूल विभागाकडून रॉयल्टी तसेच खाण पट्टा देण्यात येतो.ठराविक रॉयल्टीचीच परवानगी दिली जाते.
पश्चिम महाराष्ट्र डोंगर खाणींचे आगार
गेल्या 10-15 वर्षात पश्चिम महाराष्ट्रात डोंगर तसेच टेकडयांची खाण माफियांनी अक्षरशः चाळण केली.उत्खननाचा परवाना पाचशे-हजार ब्रासचा प्रत्यक्षात मात्र 5-10 हजार ब्रासचे उत्खनन केले जाते.मुळात एका हजार ब्रासच्या परवान्यावर डोंगरच्या डोंगर उध्दवस्त केले आहेत.बेकायदा आणि बेसुमार दगड-मुरूम उत्खननामुळे अनेक टेकडयांचे अस्तित्वच संपूण गेले आहे.या परिसरात टेकडयांवर अनेक मंदीरे आहेत.पण अशा टेकडयांनाच काही खाण माफियांनी लक्ष करत मंदीरांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे.
महसूल प्रशासनाकडून प्रकरणे ‘रफादफा’
महसूल प्रशासनाकडून दरवर्षी गौण खनिजाच्या उत्खननाची तपासणी केली जाते.तपासणीनंतर संबंधीत खाण माफियांना काही लाख-कोटींच्या दंडाच्या नोटीसादेखील धाडल्या जातात.पण ठराविक दिवस निघून गेल्यानंतर तसेच तक्रारींचा सूर सामसूम झाल्यानंतर यातील ठराविक दंड भरून अशी प्रकरणे ‘रफादफा’ केली गेल्याची चर्चा वारंवार होत असते.लेसर मशीनच्या सहायाने तपासणी केली जात असते.या मशीनमुळे नेमके किती उत्खनन झाले याची माहिती मिळते.पण प्रशासनाकडून मात्र कारवाईच्यावेळी नेमका कोणता आधार घेतला जातो हे मात्र नेहमीच गुलदस्यात राहते.
दरवर्षी बेकायदा दगड-मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियांविरोधात दंडाच्या नोटीसा निघतात.काही लाखांचा वसूल केल्याचा गाजावाजादेखील केला जातो. राजकीय वरदहस्तामुळे खाण माफियांवर कारवाई करण्यात प्रशासनाकडून कुचराई केली जाते.या व्यवसायातून अमाप पैसा मिळत असल्याने खाण माफियांची शिरजोरी चांगलीच वाढली आहे.महसूल प्रशासनातील कारवाई करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांच्या हालचालीवर खाण माफियांकडून नेहमी लक्ष ठेवले जाते.त्यामुळे कारवाई करण्यासाठी निघालेल्या काही चांगल्या अधिकाऱ्यांना फारसे काही हाती लागत नाही.पुणे परिसरातील खंडोबाचा डोंगर अक्षरशः खाण माफियांनी डोंगरावर खोदाई केल्याने पोखरून निघाला आहे.महसूल प्रशासनातील काही अधिकारी संबंधीत खाण माफियांविरोधात मोठया कारवाईचे धाडस करतात.पण स्थानिक पातळीवरील वजनदार राजकीय नेते,मंत्री यात हस्तक्षेप करत असल्याने या अधिकाऱ्यांचे हात बांधले जात आहेत.काही वजनदार राजकीय नेते खाण माफियांना पाठबळ देताना दिसत आहेत.अशा नेत्यांच्या अवतीभोवती गराडा खाण तसेच वाळू माफियांचा दिसत असतो. अधिकारीही हातचा राखून काम करताना दिसत आहेत.
बेकायदा डोंगर खोदाईमुळे पर्यावरणाचा ऱ्हास
बेकायदा डोंगर खोदाईमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे.जेवढ्या खाणी आहेत तेवढ्या ठिकाणी स्टोन क्रेशर सुरू आहेत.ही वाऱ्याच्या वेगाने उडणारी बेसुमार धूळ आजूबाजूच्या लोकांच्या जीवावर बेतली आहे. सर्वाधिक प्रमाणात भाग धुळीने व्यापला आहे.काही भागात जिकडे पहावे तिकडे खाणीच खाणी आणि जिकडे-तिकडे स्टोन क्रेशरचा पसारा वाढलेला दिसून येतो.अधून-मधून सुटलेल्या वाऱ्याच्या वेगाने स्टोन क्रेशरची धूळ पसरली जात आहे. त्यामुळे परिसरातील अनेकाना दमा,शिंका येणे,स्कीन ऍलर्जी,डोक्याचे केस गळणे,मेंदूची समस्या,फुफ्फुसाचा विकार,डोळ्याची जळजळ,डोळे दुखी तर क्रेशरच्या सतत धडधडणाऱ्या आवाजामुळे अनेकाना हृदय विकार जडण्याची भीती व्यक्त् केली जात आहे.
लहान मुलेही यातून सुटत नाहीत.तेही अशा धुळीच्या आजाराचे शिकार बनत चालले असल्याचे नागरीक सांगत आहेत.खाणीतील दगड काढण्यासाठी खाणीत सुरुंग पेरले जातात.याच्या भयंकर आवाजाने इमारती व घराना हादरे बसून ती कमकुवत होतात की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. गावभर पसरणाऱ्या धुळीमुळे शेतीने समृद्ध असलेला परिसर धूळमय बनत आहे. याचा परिणाम शेतातील पिकावरही होत आहे. पिकावर धूळ पसरत चालल्यामुळे पिके तीव्र ऊन आणि धुळीमुळे नष्ट होत चालली आहेत. पसरलेली धूळ, क्रेशरचा आवाज आणि सुरुंगाचे हादरे या समस्या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत.त्यामुळे खाण उद्योगामुळे त्रस्त झालेल्या या नागरिकांकडून अशा बेकायदेशीर व अवैध क्रेशर आणि खाणी बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.हरित लवादाने बेसुमार वाळू उपासाला लगाम घालत जशी बंदी घातली आहे:त्यास्वरूपाचे निर्बंध घालण्याची गरज आहे.
हेही वाचा…
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी–बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई–मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप‘चा विळखा होतोय घट्ट
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी !
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन‘ मराठी पेपर.
दीपोत्सव 2021-माझी संस्कृती…माझा अभिमान
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
वयोवृद्धाच्या अभंगाने प्रांताधिकारी भारावले
तुमचे नशीब बदलू शकते,घराच्या भिंतीवरचे घड्याळ लावताना ‘हे‘ लक्षात ठेवा
वास्तूप्रमाणे झोपण्याचे नियम
हजारो सर्पांना पकडून जीवदान देणारा बजरंग !
दक्षिणमुखी घर अशुभ ?