मुंबई । भारतीय हवामान विभागाने (IMD) वायव्य भारत, उत्तर मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या मैदानी भागात पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेच्या स्थितीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
IMD ने म्हटले आहे की, या महिन्याच्या २४ तारखेपर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि वायव्य मध्य प्रदेशात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने सांगितले की नैऋत्य मान्सून मालदीव आणि कोमोरिन परिसर, दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागात पुढे सरकला आहे.तसेच पुढील पाच दिवस भारताच्या दक्षिण भागात मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
शुक्रवारपर्यंत तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, माहे, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
केरळमध्ये पुढील दोन दिवस अत्यंत मुसळधार आणि त्यानंतर खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयमध्ये उद्यापर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
IMD ने बुधवारच्या सुमारास नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे.
IMD ने असेही म्हटले आहे की बुधवारपर्यंत दक्षिण द्वीपकल्पीय भारतात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयमध्येही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीत दिवसभर उष्णतेची लाट जाणवत असून पारा ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे.