लोकसभा निवडणुकांबरोबरच ४ राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली । मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.पत्रकार परिषद घेऊन राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशात लोकसभा निवडणूक ५४३ जागांवर निवडणूक होणार आहे. सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.त्याचबरोबर त्यांनी जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकाही कार्यक्रम जाहीर केला. त्याचप्रमाणे देशातील २६ रिक्त विधानसभेच्या जागेवर निवडणूक होणार आहे.
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नवनियुक्त आयुक्त ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू हे उपस्थित होते. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २०१९ लोकसभेप्रमाणेच या निवडणुकाही सात टप्यात होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, आमच्याकडे ९७ कोटी नोंदणीकृत मतदार, १०.५ लाख मतदान केंद्र, १.५ कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी, ५५ लाख ईव्हीएम, ४ लाख वाहने आहेत. त्याचप्रमाणे १.८ कोटी तरुण पहिल्यांदा मतदान आहेत. २०-२९ वयोगटातील १०.४७ कोटी मतदार आहेत.
मतदानाचे टप्पे जाणून घ्या
टप्पा १:- १९ एप्रिल २०२४ (१०२ जागा)
टप्पा २:- २६ एप्रिल २०२४ (८९ जागा)
टप्पा ३:- ०७ मे २०२४ (९४ जागा)
टप्पा ४:- १३ मे २०२४ (९६ जागा)
टप्पा ५:- २० मे २०२४ (४९जागा)
टप्पा ६:- २५ मे २०२४ (५७ जागा)
टप्पा ७:- १ जून २०२४ (५७ जागा)
मतमोजणी :- ४ जून २०२४
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे.
26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल.
26 एप्रिल
7 मे
13 मे
20 मे
25 मे
महाराष्ट्रात ‘या’ तारखांना होणार मतदान
महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
पहिला टप्पा : १९ एप्रिल एप्रिल
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार असून यावेळी पाच मतदारसंघात मतदान होणार आहे.१९ एप्रिलला विदर्भातील सहा मतदार संघात मतदान पार पडणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर १९ एप्रिलला
दुसरा टप्पा : २६ एप्रिल २०२४
राज्यात २६ एप्रिल ८ मतदारसंघात मतदान होणार असून यावेळी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा
तिसरा टप्पा : ७ मे २०२४
राज्यात ७ मे रोजी ११ मतदारसंघात मतदान होणार आहे. रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात ७ मेला मतदान होईल.
चौथा टप्पा : १३ मे २०२४
राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदारसंघात १३ मेला मतदान पार पडेल.
पाचवा टप्पा : २० मे २०२४
महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मेला होईल. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघात मतदान पार पडेल.
कोणत्या राज्यात किती टप्प्यांत होणार मतदान?
अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगढ, दादरा नगर हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड आदी राज्यांत एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांमध्ये दोन टप्प्यांत मतदान होईल.तर,छत्तीसगड, आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान होईल. ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये चार टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होईल. तसेच,उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.
गेल्यावेळी सात टप्प्यांत निवडणूक, २३ मे रोजी झाली होती मतमोजणी
याआधीच्या (सन २०१९) सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक १० मार्च रोजी जाहीर करण्यात आले होते. तेव्हा ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांत निवडणूक झाली होती. गेल्या वेळी ६७.१ टक्के मतदान झाले होते. २३ मे रोजी मतमोजणी झाली होती.