मुंबई । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम मंगळवारी रात्री (5 फेब्रुवारी 2024) अचानक बंद झाले. युजर्सचे सोशल मीडिया अकाउंट अचानक लॉग आउट होत आहेत.त्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरणाऱ्या नेटीझन्सचा मोठा हिरमोड झाला आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन्ही सोशल मीडिया अॅप प्रचंड लोकप्रिय आहेत. दररोज इथे कोट्यवधी युजर्स वेगवेगळी पोस्ट करत असतात. इन्स्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांची खाती लॉग आउट झाली आहेत. वेगवेगळ्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
वापरकर्ते सतत चिंतेत आहेत.लाखो वापरकर्त्यांनी याबद्दल तक्रार केली आहे. फेसबुक भारतीय वेळेनुसार 8.52 मिनिटांनी डाऊन झाले आहे.
तथापि, यानंतर पुन्हा लॉग इन करू शकत नाही.पुन्हा लॉग इन केल्यावर ‘समथिंग राँग’ असा संदेश येत आहे.
तुमच्यासोबतही असे होत असेल तर घाबरू नका. वास्तविक फेसबुक प्लॅटफॉर्मला आउटेजचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे वापरकर्ते लॉग आउट झाले आहेत. आउटेजमुळे तुमचा पासवर्ड स्वीकारला जात नाही, परंतु हे फक्त आउटेजमुळे होत आहे हे लक्षात ठेवा, तुमचा पासवर्ड चुकीचा नाही.