पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे.यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
विभागनिहाय निकाल
- कोकण : 97.51 टक्के
- पुणे : 94.44 टक्के
- कोल्हापूर : 94.24 टक्के
- अमरावती : 93 टक्के
- छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
- नाशिक : 94.71 टक्के
- लातूर : 92.36 टक्के
- नागपूर : 93.12 टक्के
- मुंबई : 91.95 टक्के
21 महाविद्यालयांचा शून्य टक्के निकाल
21 महाविद्यालयांचा शून्य टक्के निकाल बारावीचा लागला आहे.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा निकालात 2.12 टक्क्यांनी वाढ
यावर्षी बारावीच्या परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 95.44 टक्के तर मुलांचा 91.60. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल 2.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर मुंबईचा निकाल सर्वात कमी
राज्यात कोकण विभागातील १७.५१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ९१.९१५ टक्के असा सर्वात कमी आहे.
- यावेळीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेत 91.60 टक्के मुले आणि 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.
- यावर्षी बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला. राज्यात सर्वाधिक निकाल कोकणाचा लागला. कोकणाचा 97.51 टक्के निकाल लागला.तर, मुंबई विभागाचा सर्वांत कमी 91.95 टक्के निकाल लागला.
- राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
- विज्ञान शाखेतून सर्वाधिक 7 लाख 60 हजार 46 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. तर, कला आणि वाणिज्य शाखेतून अनुक्रमे 3 लाख 81 हजार 982 आणि 3 लाख 29 हजार 905 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी महाराष्ट्र बारावीच्या परीक्षेत, कोकण जिल्ह्यात सर्वाधिक उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के होते.
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली, ज्यात एकूण 8 लाख 21 हजार 450 मुले आणि 6 लाख 92 हजार 424 मुलींचा समावेश होता.
डिजीलॉकर मध्ये गुणपत्रिका संग्रहीत करता येणार
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा 
निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
१. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
२. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा.
३. आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
४. यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
५. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
या साईटवर जाऊन विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात.
1) mahresult.nic.in
2) mahahsscboard.in
3) hsc.mahresults.org.in
4) hscresult.mkcl.org