Last Updated on 08 Jan 2022 8:35 AM by Sanjay Patil/Adhorekhit
साहित्य
500 ग्रॅम चिकन, 2 लहान वेलची, 1 मोठी वेलची, 2 तुकडे दालचिनी, 1 तेजपान (तमालपत्र), 1/2 चमचा तिखट, 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट, 3 मध्यम आकाराच्या कांद्याची पेस्ट, 2 टोमॅटो प्युरी, चवीनुसार मीठ, साजुक तूप किंवा तेल.
कृती
सर्वप्रथम कढईत तेल गरम करा. चिकनला हलक्याने तळून बाहेर काढा. आधी तेजपान नंतर कांद्याची पेस्ट घालून त्याला सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात आलं लसुणाची पेस्ट घाला. टोमॅटो प्युरी घाला. त्यात तिखट आणि मीठ घाला. साबूत गरम मसाल्याची पूड करून अर्धी पूड त्यात घाला. चिकन घालून चांगले परतून घ्या. आता थोडे पाणी घालून त्याला शिजू द्या. नंतर त्यात उरलेली मसाल्याची पूड घाला आणि तंदुरी पोळीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !











































































