प्रतिक पाटोळे लिखित शहीद-ए-आझम भगतसिंह पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन
सांगली । वैचारिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी महापुरुषांचे विचार अग्रगण्य भूमिका बजावतात असे प्रतिपादन न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस पुण्याचे प्रकाशक,वक्ते, लेखक, उद्योजक, शरद तांदळे यांनी व्यक्त केले.
राजारामबापू नाट्यगृह इस्लामपूर येथे प्रतिक दिपक पाटोळे लिखित शहीद-ए-आझम भगतसिंह या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभी बोलत होते. अध्यक्षस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष बापू पाटील होते प्रारंभी प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाळवा व शिराळा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना तांदळे म्हणाले, इतिहास सत्यावर आधारित असतो आणि महापुरुष सत्याचा मार्ग दाखवतात, आपले मूळ महापुरुष आहेत ते वैचारिक बंडात नेहमी अग्रगण्य आहेत त्यांच्या विचारांचा प्रसार नेहमी व्हायला पाहिजे म्हणूनच अशा पुस्तकांची नितांत गरज आहे, भगतसिंहाचा संघर्ष विचारभान निर्माण करतो असेही ते म्हणाले
यावेळी अगदी कमी वयात पुस्तक लिहिल्याबद्दल लेखक प्रतिक पाटोळे यांचा सत्कार करण्यात आला
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे नातू गौरव भाऊ नायकवडी म्हणाले, आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला पाहिजे,
इतिहास संशोधिका डॉ. देविकाराणी पाटील म्हणाल्या, बहुजन समाजासाठी साधने उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. लेखकांनी भगतसिंहाचे खंड तयार करावेत,
पुस्तकामध्ये कविता लिहिणारे आकाश कदम म्हणाले, पेनाने केलेले क्रांती नक्कीच जिवंत राहील क्रांतीची सुरुवात लेखनातून होते,
कार्यक्रम संयोजन शहीद-ए-आझम भगतसिंह पुस्तक प्रकाशन सोहळा समितीने केले यावेळी स्वातंत्र्यसंग्रामात शौर्य गाजवलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा विशेष सन्मान करण्यात आला, कवी धर्मवीर पाटील यांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. शामराव पाटील, माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन ऋतुराज पाटील व दिपाली क्षीरसागर यांनी तर प्रास्ताविक संकेत शिंदे व आभार इंद्रजीत पाटील यांनी मानले.