India vs New Zealand Final : टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये इतिहास घडवला आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला आहे.
धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला आहे. त्याचसोबत 2000 साली न्यूझीलंडने फायनलमध्ये भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. या पराभवाचा बदला आज टीम इंडियाने 25 वर्षानंतर घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा विजय आहे.
न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 49 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 254 धावा केल्या.
टॉस जिंकून न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 251 धावा केल्या. डॅरेल मिचेल आणि मायकल ब्रेसवेल या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. डॅरेल मिचेल याने 63 तर मायकल ब्रेसवेलने 53 धावांचं योगदान दिलं. रचीन रवींद्र याने 37 तर ग्लेन फिलिप्सने 34 धावा केल्या. तर टीम इंडियसााठी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि चायनामॅन कुलदिप यादव आणि वरूण चक्रवर्ती ठरला आहे. कारण धावांचा पाठलाग करताना रोहितने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर अय्यरने 48 धावांची खेळी केली आहे. तर गोलंदाजी दरम्यान कुलदिप यादव आणि वरूण चक्रवर्ती प्रत्येकी 2 विकेट काढल्या होत्या. या खेळाडूंसह के एल राहुल देखील टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.
न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारताला 251 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य भारताने षटकात पूर्व केले. भारताकडून रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत 76 धावा केल्या. त्यात 3 षटकारांचा समावेश होता. भारताची सुरूवात चांगली झाली. मात्र त्यानंतर 31 धावांवर शुभमन गिल बाद झाला. त्यानंतर केवळ एक धाव काढून विराट कोहली ही तंबूत परतला. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. त्यांच्या या भागिदारीने विजयाचा पाया रचला. श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या.
श्रेयस अय्यननंतर अक्षर पटेलने 29 धावांची खेळी केली. त्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या केएल राहुलने डाव सावरला. त्याला हार्दीक पंड्याची साथ मिळाली. मात्र हार्दीकही 18 धावा काढून बाद झाला. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांनी जास्त पडझड होवू दिली नाही. केएल राहुलने 34 धावांची खेळी केली. भारताने न्यूझीलंडचा एक षटक आणि चार गडी राखून पराभव केला. टी ट्वेंटीनंतर भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.