Last Updated on 11 Dec 2025 5:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यात सॉईल मॉडिफायर कंपोस्ट बॅगिंगचा विक्री शुभारंभ करण्यात आला. कारखान्याच्या वतीने दरवर्षी प्रेसमड वर प्रक्रिया करून शेतकऱ्यांसाठी कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. सभासद शेतकऱ्यांसाठी अल्प दरात उपलब्ध करून दिली जाते. याचा प्रारंभ कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्या हस्ते करण्यात आला.
कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने दर्जेदार कंपोस्ट निर्मिती करून शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध केले आहे. प्रेसमेडवरती प्रक्रिया करून पोल्ट्री खत, फिश मिल, विविध जिवाणू खते यांचे मिश्रण करून त्यावरती प्रक्रिया करुन पल्वरायझरमध्ये बारीक करून कंपोस्ट बॅग तयार केली जाते.
कंपोस्ट बॅगिंग निर्मिती शुभारंभाच्या वेळी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, कारखान्याने नेहमी सभासदांचा व शेतकऱ्यांचा विचार करून धोरणे राबविली आहेत. कंपोस्ट खतांचा जास्तीत जास्त सभासद शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, तसेच सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपला नोंदविलेला ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवावा.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर, परचेस ऑफिसर विक्रमसिंह माने आदी उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Dec 2025 11:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit 🔸कोणत्या राशीसाठी संधी, कोणासाठी सावधगिरी, जाणून घ्या 🔸आठवड्याची सुरुवात कशी करावी? ग्रह काय सुचवतात 🔸शुभ दिवस, रंग आणि उपाया... Read more













































































