Last Updated on 14 Nov 2025 10:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
डॉ. सुरेश सावंत हे मराठी बाल साहित्यातील दिग्गज नाव आहे. ‘आभाळमाया’मधील कविता मुलांच्या कल्पनाविश्वाला हात घालतात. साधी, भावपूर्ण आणि कल्पनाशील भाषेत लिहिलेल्या या रचना निसर्ग, आकाश, स्वप्ने आणि बालमनाशी जोडलेल्या आहेत. लहान मुलांना आनंद, समज व सौंदर्यदृष्टी देणाऱ्या या कविता त्यांच्या लेखनशैलीचे उत्तम उदाहरण आहेत.डॉ. सावंत यांच्यासह असमियासाठी सुरेंद्र मोहन दास (‘मइनाहंतर पद्य’ – कविता), बाङ्लासाठी त्रिदिब कुमार चट्टोपाध्याय (‘एखनउ गाये काँटा देय’ – कहानी), बोडोसाठी बिनय कुमार ब्रह्म (‘खान्थि बोसोन आरो आखु दानाय’ – कहानी), डोगरीसाठी पी.एल.परिहार ‘शौक़’ (‘नन्हींटोर’ – कविता), इंग्रजीसाठी नितिन कुशलप्पाएमपी (‘दक्षिण, साउथ इंडियन मिथ्स अँड फै़ब्लस रीटोल्ड’ – कहानी), गुजरातींसाठी कीर्तिदा ब्रह्मभट्ट (‘टिंचाक’ – कविता), हिंदीसाठी सुशील शुक्ल (‘एक बटे बारह’ – संस्मरण), कन्नडसाठी के. शिवलिंगप्पा हंदिहाल (‘नोटबुक’ – कहानी), कश्मीरीसाठी इज़हार मुबशिर (‘शुरे ते चुरे ग्युश’ – कहानी), कोंकणीसाठी नयना आडारकार (‘बेलाबायचो शंकर आनी हेर काणयो’ – कहानी), मैथिलीसाठी मुन्नी कामत (‘चुक्का’ – कहानी), मलयाळमसाठी श्रीजित मुत्तेडत्तु (‘पेन्गिनुकळुडे वन्करायळ’ – उपन्यास), मणिपुरीसाठी शांतो एम (‘अंगाङ्शिङ्गी शान्बुङ्सिदा’ – नाटक), नेपाळीसाठी साङ्मुलेप्चा (‘शान्ति वन’ – उपन्यास), ओडिआसाठी राजकिशोर पाढ़ी (‘केते फुल फुटिचि’ – कविता), पंजाबीसाठी पाली खादिम (अमृत पाल सिंह) (‘जादू पत्ता’ – उपन्यास), राजस्थानीसाठी भोगीलाल पाटीदार (‘पंखेरुवं नी पीड़ा’ – नाटक), संस्कृतसाठी प्रीति पुजारा (‘बालविश्वम्’ – कविता), संतालीसाठी हरलाल मुर्मु (‘सोना मीरु-वाक् सांदेश’ – कविता), सिंधीसाठी हीना अगनाणी ‘हीर’ (‘आसमानी परी’ – कविता), तमिळसाठी विष्णुपुरम सरवणन (‘ओट्राइचिरगु ओविया’ – उपन्यास), तेलुगुसाठी गंगिशेट्टी शिवकुमार (‘कबुर्ला देवता’ – कहानी) आणि उर्दूसाठी ग़ज़नफ़र इक्बाल (‘क़ौमी सितारे’ – लेख) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.











































































