Last Updated on 07 Jan 2022 4:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दुबई |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी काही विशेष नियम बनवलेले आहेत. आता याच नियमांवलीत त्यांनी नव्या नियमाची भर पाडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात छोटे स्वरुप, T20 क्रिकेटशी हा नियम संबंधित आहे.या नियमामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्यांची एक चूक खूप महागात पडू शकते.या महिन्यापासूनच संघांना T20 सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी मोठी शिक्षा होणार आहे.
सध्या T20 क्रिकेट सामन्यात पावरप्लेनंतर 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर उभे राहतात. परंतु या नव्या नियमानंतर फक्त 4 क्षेत्ररक्षक या अंतराच्या बाहेर उभे राहू शकतील.सध्या पॉवरप्लेनंतर (पहिली सहा षटके) पाच क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर राहू शकतात, पण नवीन नियमानुसार संघाची चूक असेल, तर फक्त चार क्षेत्ररक्षक बाहेर राहू शकतील. सामन्यादरम्यान ड्रिंक्स इंटरव्हल घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. हे नियम जानेवारी 2022 पासून लागू होतील.
याव्यतिरिक्त द्विपक्षीय मालिकांमधील दर डावादरम्यान अडीच मिनिटांचा पर्यायी ड्रिंक्स ब्रेक घेण्याचाही नियम लागू करण्यात आला आहे. परंतु हा नियम तेव्हाच लागू करण्यात येईल, जेव्हा मालिकेपूर्वी उभय संघ यासाठी सहमत असतील.
T20 क्रिकेटमधील मोठ्या बदलांशी संबंधित असलेले हे नियम वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड यांच्यात 16 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकमेव T20 सामन्यापासून लागू होतील. तसेच महिला क्रिकेटमध्ये हे नवे नियम दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील सेंच्यूरियनमधील T20 सामन्याने अंमलात आणले जातील. हा सामना 18 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !











































































