वाळवा पंचायत समिती ठरली जिल्ह्यातील सौर उर्जेवर वीज निर्मिती पहिली पंचायत समिती

अधोरेखित ऑनलाइन डेस्क । इस्लामपूर येथील वाळवा पंचायत समितीच्या इमारतीवर 14 किलो वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे.त्यामुळे आता पंचायत समिती अंतर्गत सर्व कार्यालये विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत.सौर उर्जा प्रकल्प उभारणारी वाळवा पंचायत समिती जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.
सध्या सर्वत्र सौर उर्जा प्रकल्प उभारणीला शासनाकडून प्राधान्य व प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून वाळवा पंचायत समितीनेही हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.याच्या आराखड्याला महा उर्जानेही मंजूरी दिली.यासाठी यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 7 लाख 30 हजार रुपये खर्च करण्यात आहेत.
14 किलो वँट क्षमतेच्या या सौर उर्जा प्रकल्पामूळे पंचायत समितीच्या सर्व कार्यालयांना लागणारी सर्व विज उपलब्ध झाली आहे.त्यामुळे पंचायत समितीच्या मासिक वीज बिलाचीही सुमारे 15 हजार रुपयांची बचत होणार आहे.या वाचलेल्या वीज बिलामुळे या प्रकल्पाचा खर्चही पाच-सहा वर्षात निघणार आहे.सौर उर्जा प्रकल्प उभारणारी वाळवा पंचायत समिती जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.याचा आदर्श इतर शासकीय कार्यालयांनीही घेणे गरजेचे आहे.पंचायत समितीने अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची पाऊलवाट तयार केली आहे.ग्रामपंचायतींनी त्यावरून वाटचाल करणे आवश्यक आहे.
पंचायत समितीमध्ये उभारण्यात येणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पामुळे वीज बिलाची बचत होणार आहे.यासाठी 7 लाख 30 हजार खर्च आला असून हा निधी 15 व्या वित्त आयोगातून उपलब्ध झाला आहे.आता तालुक्यातील ग्रामपंचायती व जि.प. शाळांमधूनही सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.