सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी २९ जुलै रोजी मुलाखती
मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ मधून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी राज्यातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ मधून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.आयोगाकडुन उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीबाबतच्या सूचना व कार्यपध्दती तसेच वैद्यकीय तपासणीचा दिनांक व ठिकाण उमेदवारांना स्वतंत्ररित्या त्यांच्या प्रोफाईलद्वारे कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी २९ जुलै रोजी मुलाखती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती सहयोगी प्राध्यापकांसह विविध पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती २९ जुलै, २०२४ रोजी नवी मुंबई, सीबीडी, बेलापूर कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
मुलाखती या सहयोगी प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ आणि अन्य विविध संवर्गासाठी होणार असून मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.