पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीचा निकाल येत्या 27 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.दुपारी एक वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.मंडळाने राज्यातील एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये ही परीक्षा घेतली होती.परीक्षेचा निकाल परवा,सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या संदर्भातील घोषणा परिपत्रकाद्वारे केली.
बोर्डाकडून बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यानंतर 10 वीच्या निकाला बाबत प्रतीक्षा होती. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 27 मे रोजी 10 वीचा निकाल जाहीर करणार आहे. ही परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत घेण्यात आली होती. विभागीय मंडळाने पेपर तपासणी पूर्ण केली आहे.
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. तसेच एसएमएस आणि डिजीलॉकरच्या (https://results.digilocker.gov.in) माध्यमातून देखील तुम्ही हा निकाल पाहू शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा 1 मार्च ते 6 मार्च दरम्यान झाली. या परीक्षेसाठी राज्य भरातून दहावीच्या 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
गेल्या वर्षी, महाराष्ट्र SSC चा निकाल 2 जून 2023 रोजी जाहीर झाला होता. दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.83 इतकी होती. महाराष्ट्रात एकूण 15,29,096 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14,34,893 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. विभागनिहाय निकाल पाहता कोकण 98.11 टक्के घेऊन अव्वल ठरला.
ऑनलाइन निकालानंतर…
ऑनलाइन निकालानंतर दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी 28 मे 11 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरता येईल.
मार्च 2024 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील. पुनर्मूल्यांकन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
SSC Result 2024 चा असा तपासा निकाल
1) सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
2) होमपेजवर Results पेजवर क्लिक करा.
3) महाराष्ट्र दहावीचा निकाल 2024 या लिंकवर क्लिक करा.
4) लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर भरा आणि सबमिट करा.
5) दहावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
5) आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
खाली दिलेल्या संकेतस्थळांवर इयत्ता दहावीचा निकाल पाहता येईल.
3. https://sscresult.mahahsscboard.in
4. https://results.digilocker.gov.in
5. https://results.targetpublications.org