7 गुणवंत ग्रामरोजगार सेवकांचा सत्कार
सांगली । ग्रामरोजगार सेवकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून वाळवा पंचायत समितीकडील ग्रामरोजगार सेवकांना हे टॅब मिळाले.वाळवा पंचायतीत आज (शुक्रवारी) 94 ग्रामरोजगार सेवकांना टॅब वाटप तसेच 7 गुणवंत ग्रामरोजगार सेवकांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमीचे काम सुरू आहे. ही कामे ऑनलाइन असतात.कामाची मागणी आली की माहिती कळविणे,मजुरांची हजेरी नोंदविणे आदी कामे करावी लागतात.अनेक वर्षांपासून ग्रामरोजगार सेवक संघटनेकडून टॅबची मागणी करण्यात येत होती.या मागणीची दखल घेत शासनाने ग्रामरोजगर सेवकांना टॅब देण्याचा निर्णय घेतला आहे.
वाळवा पंचायतीत आज (शुक्रवारी) 94 ग्रामरोजगार सेवकांना प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,तहसीलदार प्रदीप उबाळे,गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या हस्ते टॅब वाटप करण्यात आले.यावेळी सुनील गावडे,सुजाता पवार,विष्णू थोरात,प्रताप चटणे, सुहास पाटील,शिवाजी गायकवाड,रामचंद्र घारगे या 7 गुणवंत ग्रामरोजगार सेवकांचा सत्कार करण्यात आला.
गटविकास अधिकारी आबासाहेब पवार म्हणाले,ग्रामरोजगार सेवकांना टॅब मिळाल्यामुळे कामाचा उरक वाढेल.रोजची 66 कामे करण्यासाठी माहिती भरण्यासाठी टॅब उपयुक्त आहेत.
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमोल पवार यांनी स्वागत व आभार मानले.अमोल सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमोल पवार,विकास शिंगटे,मच्छिंद्र पाटील,जनार्दन गायकवाड आदींनी संयोजन केले.सुनील गावडे यांनी आभार मानले.