एकीकडे आपले दात वाढत्या वयाबरोबर तुटायला लागतात, तर दुसरीकडे लोकांना त्यांच्या तरुणपणात दातांसंबंधी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी एक दातात कीड लागणे आहे.
आरोग्याची काळजी घेत असताना अनेक लहान-लहान गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दातदुखीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. दातांची निगा न राखल्याने ते किडतात. त्यामुळे होणाऱ्या वेदना आणि नंतर अन्न खाणंही कठिण होतं. दातदुखीवर सुरुवातीलाच काही घरगुती उपाय केले तर त्यातुन सुटका होऊ शकते. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासले पाहिजेत. यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहतील. त्याशिवाय घरात रोजच्या आहारात असलेल्या काही पदार्थामुंळेही दात निरोगी राखता येतील.
संक्रमित दातांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा खूप पैसे खर्च होतात. अशा परिस्थितीत दातांमधील कीड काढण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करावा.
हळद मिठाची पेस्ट
दातांवरील जंत दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात हळद आणि मीठ मिसळून त्याची पेस्ट तयार करावी लागेल. मग ही पेस्ट तुम्हाला ब्रशच्या सहाय्याने कीटकग्रस्त भागावर लावावी लागेल, जसे ब्रश करता. दिवसातून दोनदा असे केल्याने तुमचे दात लवकर साफ होण्यास मदत होते.
तुरटी पावडर आणि सेंधव मिठाची पेस्ट
दातामध्ये कीड असल्यास तुम्ही तुरटी पावडर घेऊन त्यात सेंधव मीठ टाकून पेस्ट तयार करू शकता. त्यानंतर ही पेस्ट ब्रशच्या मदतीने दातांवर लावावी लागते. असे केल्याने दातांमधील कीड दूर होऊ शकते.
लवंगाचं तेल
दातात कीड लागल्यास लवंगाच्या तेलाने आराम मिळू शकतो. या साठी हे तेल काही वेळासाठी दातांवर लावून ठेवा. दररोज असं केल्याने दातातून कीड निघेल आणि वेदनेपासून आराम मिळेल.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
हिंगाच्या पाण्याने गुळणे करणे
दातांमध्ये कीड लागली असल्यास हिंग पाण्यात घालून उकळवून द्या. नंतर पाणी कोंबट झाल्यावर या पाण्याने गुळणे करा. हे उपाय केल्याने दातातील कीड नाहीशी होईल.
जायफळ तेल
हे तेल किडलेल्या दातांसाठी उपयुक्त आहे. एक कापसाचा गोळा या तेलात बुडवून दुखत असेलेल्या दाताखाली पाच मिनिटांसाठी ठेवायचा. तो काढल्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या केल्यास दातातील किड नाहीशी होते.
लसूण
फोडणीसाठी वापरला जाणारा लसूणही दातदुखीसाठी उपायकारक आहे. यामध्ये अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल हे गुणधर्म असतात. लसूण सोलून त्याची एक पाकळी सैंधव मिठात घोळून ज्या दातात किड आहे तिथं धरा. एक-दोन मिनिटे लसूण तसाच ठेवा. यामुळे दातात होणाऱ्या किडीपासून सुटका होईल.
घरगुती उपाय हे दातदुखी प्राथमिक अवस्थेत असताना केल्यास फायदेशीर ठरतात. तसेच डॉक्टरकडे जाईपर्यंत दातांमध्ये होणाऱ्या वेदना थांबवण्यासाठी या उपचारांची मदत होते. दात अधिक दुखत असतील किंवा दात जास्त खराब झाले असतील तर डेंटिस्टकडे जाऊन उपचार घेणे योग्य ठरेल. तुम्ही सुरुवातीला जरी डॉक्टरांकडे गेलात तर ते याबाबत मार्गदर्शन करतील.
दात किडू नये म्हणून काय काळजी घ्यावी :
1.ब्रशिंग व गुळणा याद्वारे दात स्वच्छ ठेवावे. रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासावे.
2.खाणे हे सुयोग्य वेळी असावे. गोड पदार्थांचे अतिसेवन टाळावे. सकस आहार घ्यावा.
3.दात कोरू नये. डेंटल फ्लॉस वापरावा.
4.कृत्रिम दातांची योग्य काळजी घ्यावी.
5.वेडे-वाकडे दात असल्यास अन्नकण अडकून कीड लागू शकते. तेव्हा दात सरळ करण्याची ट्रिटमेंट करून घ्यावी.
6.एखादा दात काढलेला असल्यास त्याजागी दुसरा दात न बसवल्यास कालांतराने इतर दात त्याजागी सरकतात व कीड लागणे, हिरड्या सुजणे, असे त्रास उद्भवतात.
7.दातांच्या डॉक्टरांचा नियमीत सल्ला घेणे.
(टीप : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत अधोरेखित कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)