तुकाराम बाबर यांच्या ‘हसरी पाने’ पुस्तकाचे प्रकाशन
इस्लामपूर । आजच्या ताण-तणावाच्या जीवनात विनोद,हसणे अनमोल आहे. तुकाराम मारुती बाबर यांनी लिहिलेल्या ‘हसरी पाने’मधील छोटे-छोटे विनोद वाचकांना तणावमुक्त जीवनाचा आनंद नक्की देतील,असा विश्वास महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती परिषदेचे सदस्य प्रा. शामराव पाटील यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या सभागृहात श्री.तुकाराम मारुती बाबर यांनी लिहिलेल्या ‘हसरी पाने’या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिध्द कादंबरीकार मनोज बोरगावकर,शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा.शामराव पाटील हे समारंभाचे अध्यक्ष होते.
याप्रसंगी ॲड.बी.एस.पाटील,प्राचार्य आर.डी.सावंत,डॉ.दीपा देशपांडे,प्रा.डॉ.संजय थोरात,डॉ.अर्चना थोरात,प्रा.शैलजा यादव- पाटील,प्रा.राजाभाऊ माळगी,जेष्ठ साहित्यिक शहानवाज मुल्ला,साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दीपक स्वामी,प्रा.दशरथ पाटील, प्रा. अर्जुन पाटील,महेश पाटील,स्वरूप खुपरेकर, प्रदीप बाबर,विवेक बाबर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी ‘हसरी पाने’चे लेखक तुकाराम मारुती बाबर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.दीपक स्वामी यांनी आभार मानले.