सध्या राज्यात विविध ठिकाणी जोराचा पाऊस पडत आहे.या काळात नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचे असते.मात्र,अशावेळी खबरदारी नाही बाळगली तर ते दुर्घटनेला आमंत्रण ठरते.फक्त भटकंती करणाऱ्यांनीच नाही तर सर्वांनीच अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीत काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात.अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीत नेमकी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती पाहुया…
माहिती घ्या, अफवा टाळा
पूर येण्यापूर्वी नागरिकांनी व्हॉटस्ॲप किंवा इतर समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये.आपत्कालीन परिस्थितीसाठी एसएमएसचा उपयोग करावा. आपला मोबाईल चार्ज करुन ठेवावा.हवामानातील बदलांची अद्ययावत माहिती रेडिओ, टी.व्ही.वर पाहत राहावी.गुरेढोरे, पशुंच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करुन घ्यावी.
आवश्यक वस्तूसह आपत्कालीन कीट तयार ठेवावी. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक पिशवीत जवळ ठेवावे.जवळपास असलेली निवारा, पक्के घराकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग जाणून घ्यावा.सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करावे. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा, पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्यापासून नागरिकांनी सतर्क राहावे.
पूर जर तुमच्या आजूबाजूच्या भागात जर पूर आला असेल तर…
• माहितीसाठी रेडिओ किंवा टीव्ही ऐका.
• अतिवृष्टीमुळे पूर येऊ शकतो हे लक्षात ठेवा.पावसामुळे पूर येण्याची शक्यता असल्यास उंचावर जाऊन थांबा.त्यासाठी कोणाच्याही सूचनेची वाट पाहू नका.
• प्रवाह, ड्रेनेज चॅनेल, कॅन्यन आणि पूराचा धोका असणाऱ्या प्रदेशांमध्ये सावधान राहा.अशा भागांमध्ये कोणत्याही पुर्व इशाऱ्याशिवाय पूर येऊ शकतो.
तुम्ही घराबाहेर पडण्याची तयारी करत असाल तर…
• आपले घर सुरक्षित ठेवा.हातात वेळ असेल तर बाहेरचे फर्निचर आत आणून ठेवा.महत्त्वाच्या वस्तू वरच्या मजल्यावर हलवा.
• तुम्हाला सूचना मिळाली असेल तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मुख्य स्विचेस आणि वॉल्व बंद करा.सर्व विद्युत उपकरणे बंद करुन ठेवा.तुम्ही पाण्यात असाल किंवा ओले झाले असाल तर विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका.
घर सोडणे आवश्यक असल्यास, या गोष्टी लक्षात ठेवा…
• वाहत्या पाण्यात चालू नका. प्रवाहाची सहा इंचापेक्षा जास्त असेल तर तुमचा तोल जाऊ शकतो.प्रवाही नसणाऱ्या पाण्यात तुम्ही चालू शकता.जमिनीवर पाय घट्ट ठेवण्यासाठी जमिनीची तपासणी करण्यासाठी एखादी काठी सोबत ठेवा.
• पूर आलेल्या भागांमध्ये जाऊ नका.जर आपली गाडी पाण्याखाली जायची असेल तर ती तशीच राहू द्या आणि तुम्ही सुरक्षित स्थळी धाव घ्या.पाण्याच्या प्रवाहात तुम्ही आणि तुमचे वाहन वेगाने वाहून जाऊ शकते.
प्रत्यक्ष पूरस्थिती उद्भवल्यास…
1. सरकारी आज्ञेचे पालन करा आणि अधिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.
2. सुरक्षित ठिकाणी रहा आणि योग्य ती माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा.
3. विद्युत पुरवठा बंद करा आणि उघड्या तारांना स्पर्श करु नका.
4. अफवांमुळे घाबरुन जाऊ नका आणि स्वतः अफवा पसरवू नका.
हे करा..
1. विद्युत आणि गॅस उपकरणे व मुख्य स्विचेस बंद करा.
2. आपत्कालीन किट सोबत ठेवा आणि तुमचे मित्र आणि कुटुंबीयांना तुम्ही कोठे जात आहात हे कळवा.
3. पूराच्या पाण्याशी संपर्क टाळा. हे पाणी मल, तेल, रसायने किंवा इतर पदार्थांमुळे दूषित असू शकते.
4. तुम्हाला जर पाण्यात उभे राहायचे असेल तर खांब किंवा काठीचा वापर करा.पाण्याची खोली तसेच ड्रेनेजचे खड्डे आणि नाले तपासा.
5. विजेच्या तारांपासून लांब रहा कारण पाणी हे विद्युतप्रवाहाचे वाहक आहे.वीज कंपन्यांकडे खाली पडलेल्या विजेच्या तारांविषयी तक्रार करा.
6. पूराचे पाणी ओसरलेल्या जमिनीवरुन चालताना काळजी घ्या.ढिगाऱ्याखालील जमिनी व फरशांवर फुटलेल्या काचा, अणकुचीदार वस्तू,खिळे इत्यादी वस्तू असू शकतात.चिखल आणि गाळ साचलेल्या जमिनीवरुन पाय घसरण्याची भीती असते.
7. अद्ययावत माहिती व बातम्या मिळविण्यासाठी रेडिओ किंवा टेलिव्हिजन ऐका.
8. इमारतीचे छत ओले झाले असेल तर वीज बंद करा.जिथून पाणी गळत असेल तेथे खाली बादली ठेवा आणि छताला लहानसे छिद्र पाडा जेणेकरुन त्यावरील भार थोडा कमी होईल.
9. खोलीतील पाणी काढून टाकण्यासाठी बादल्या, स्वच्छ टॉवेल्स आणि कपड्यांचा वापर करा.
10. फर्निचर आणि ओल्या कार्पेटमध्ये अॅल्युमिनियम फॉइल शीट ठेवा.
हे करु नका…
1. वाहत्या पाण्यातून चालू नका. त्यामुळे तुमचा पाय घसरण्याची भीती आहे.
2. वाहत्या पाण्यामध्ये पोहू नका. यादरम्यान वाहून जाण्याची किंवा एखाद्या वस्तूला धडकण्याची दाट शक्यता असते.
3. पूरग्रस्त भागातून वाहने नेऊ नका. तुम्हाला त्या परिसरातील अडथळ्यांचा अंदाज येणार नाही. तसेच अवघ्या अर्धा मीटर पाण्यात वाहने वाहून जाण्याची दाट शक्यता असते. तसेच पूरग्रस्त भागातून वाहने चालवताना आजूबाजूच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.
4. पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले कोणतेही अन्न खाऊ नका.
5. अभियंताने तपासणी केल्याशिवाय वीजेचा वापर सुरु करु नका. गॅस गळतीबाबत सावध रहा. मेणबत्त्या, कंदील किंवा कसलीही ज्योत पेटवू नका.
6. वस्तूंवरील चिखल घासण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे मालमत्तेचे आणखी नुकसान होऊ शकते.
7. छत ओले असताना त्याला जोडलेली उपकरणे वापरु नका.
8. ओल्या फरशीवर उभे राहून टीव्ही, व्हीसीआर, सीआरटी टर्मिनल्स किंवा इतर इलेक्ट्रीकल उपकरण सुरु करु नका.
9. व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करून साचलेले पाणी काढण्याचा प्रयत्न करू नका.
10. तळघरातील पाणी बाहेर काढण्याची घाई करु नका. गरजेपेक्षा अधिक कमी वेळात पाण्याचा दबाव कमी झाला तर भिंतींवर ताण वाढू शकतो.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा
वीजप्रवाह : पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
थर्ड पार्टी इन्शुरन्स शिवाय रस्त्यांवर गाडी चालवणे हा दंडनीय गुन्हा…
भूस्खलन : हे करा…
• हवामान विभाग किंवा न्यूज चॅनेलवर माहिती पाहून डोंगराळ प्रदेशात दौरा आखा.
•वेळ न दवडता भूस्खलन मार्गावरुन किंवा दऱ्यांपासून लांब जा.
• गटारे स्वच्छ ठेवा.
• कचरा, पाने, प्लॅस्टिकची पिशव्या, मलबा इत्यादीचा निचरा झाला आहे याची तपासणी करा.
• ‘वीप होल्स’ उघडे ठेवा.
• भरपूर झाडे लावा जेणेकरुन ते मातीला मूळापासून घट्ट धरुन ठेवतील.
• भूस्खलनाचा इशारा देणाऱ्या प्रदेशातील दगड कोसळलेल्या, खचलेल्या इमारतींची तपासणी करा आणि सुरक्षित स्थळी धाव घ्या. नदीतील गढूळ पाण्यावरुनदेखील वरच्या भागात भूस्खलन झाल्याचा अंदाज येऊ शकतो.
• भूस्खलनाच्या सूचनांकडे लक्षा द्या आणि जवळच्या तहसील किंवा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधा.
• जमिनीच्या उतारांची टोके कापलेली नाहीत आणि सुरक्षित आहेत याची खात्री करा. जोपर्यंत नवी झाडे लावण्याची योजना केली जात नाही तोपर्यंत जुनी झाडे कापू नका.
• झाडांची पडझड किंवा खडक कोसळण्याच्या अनैसर्गिक आवाजांकडे लक्ष द्या.
• भूस्खलनाचा परिणाम होण्याची शक्यता असल्यास दक्ष, जागृत आणि सक्रिय राहा.
• योग्य आश्रयस्थान शोधा.
• आपल्या कुटुंब आणि मित्र मैत्रिणींसोबत राहण्याचा प्रयत्न करा.
• जखमी आणि अडकलेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करा.
• तुम्ही जात आहात तो मार्ग लक्षात ठेवा जेणेकरुन तुम्ही जंगलात हरवणार नाही.
• हेलिकॉप्टर व बचाव पथकांना आपत्कालीन वेळ दरम्यान संकेत कसे द्यायचे आणि कशा प्रकारे संवाद साधावे हे जाणून घ्या. हे करु नका.
• बांधकाम सुरु असणाऱ्या किंवा संवेदनशील भागात राहण्याचे टाळा.
• रडून किंवा घाबरुन तुमची ऊर्जा खर्च करु नका.
• उघड्यावरील वस्तू किंवा सूटलेल्या विद्युत तारांना स्पर्श करु नका. जवळच्या ढिगाऱ्याजवळ आणि ड्रेनेज मार्गाजवळील घरे बांधू नका.
• झरे, विहिरी किंवा नद्यांचे दूषित झालेले पाणी थेट पिऊ नका.
• मोठा धोका असल्याशिवाय जखमी व्यक्तींना प्रथमोपचार न करता हलवू नका.
नागरीकांना आवाहन
- अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे/भूस्खलनामूळे धोका निर्माण होणाऱ्या गावातील नागरिकांनी अतिवृष्टीच्या कालावधीत सतर्क रहावे. धोकादायक स्थतीत अथवा मोडकळीस आलेल्या घरात राहू नये. स्वत:हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.
- धोकादायक ठिकाणी शक्यतो प्रवास टाळावा. कडा कोसळणे/दरडी कोसळण्याच्या ठिकाणी थांबू नये.
- अतिवृष्टीचे काळात मोठया प्रमाणात डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरु असतो, ओढे-नाले पात्र भरुन वाहत असतात अशावेळी पूराच्या पाण्यात/ओढयातून प्रवास टाळावा. तसेच नदी, ओढ्यानाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास धोकादायक स्थितीमध्ये पूल ओलांडू नये.
- जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
- पर्यटनाचे ठिकाणी उदा. धबधबे, तलाव इ. ठिकाणी धोकादायक ठिकाणी प्रवेश करु नये. त्याचप्रमाणे धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याचे अथवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.
- नदी अथवा नाल्याची पाणी पातळी वाढल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात प्रवेश करु नये.
- अतिवृष्टीच्या कालावधीत तात्काळ सुरक्षित जागेत (नातेवाईक,समाजमंदिर,शाळा इ.ठिकाणी)
स्वत: हून स्थलांतरित व्हावे
- मान्सून कालावधीत साथीच्या रोगांपासून वाचण्यासाठी शक्यतो पाणी उकळून गार करुन प्यावे.
- विजा कडकडत असताना कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. (पाण्यात असल्यास तात्काळ बाहेर पडावे)