नवी दिल्ली । नरेंद्र मोदी यांनी आज अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएच्या अनेक खासदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे.देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिलेले बघायला मिळाले.नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली होती, त्यानंतर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची शपथ दिली.
मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…ईश्वर की शपथ लेता हूँ की… मैं विधीद्वारा स्थापित भारत के संविधान के प्रती सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा. मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंत:करणसे निर्वहन करूंगा. तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रती संविधान और विधी के अनुसार न्याय करूंगा. मैं… नरेंद्र दामोदरदास मोदी… ईश्वर की शपथ लेता हूं की जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ती या व्यक्तीयों को तब के सिवाय, जब की प्रधानमंत्री के रुप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा…
यावेळी शपथ घेण्याचा निश्चित क्रम ठरलेला होता.त्यानुसार, सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली.त्यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी शपथ घेतली. चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी तर पाचव्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शपथ घेतली. नड्डांच्या नंतर शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
एनडीए सरकारमध्ये मोदींसह 72 मंत्री असतील. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार मंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश असेल.
महाराष्ट्रातील 6 खासदांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये संधी
नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील खासदारांनादेखील संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार पीयूष गोयल यांनीदेखील मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. याशिवाय खासदार प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, रामदास आठवले हे देखील आज मंत्रिमंडळाची शपथ घेत आहेत.
मोदींचे नवे मंत्रिमंडळ : अमित शाह, सी.आर. पाटील, मनसुख मांडविया, जेपी नड्डा, अजय टमटा, रवनीत बिट्टू, नितीन गडकरी, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, पियुष गोयल, मुरलीधर मोहळ, रामदास आठवले, शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, सावित्री ठाकूर, वीरेंद्र खटीक, गजेंद्र शेखावत, भगीरथ चौधरी, अर्जुन राम मेघवाल, अश्विन वैष्णव, भूपेंद्र यादव, जितन राम मांझी, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, गिरिराज सिंह, चिराग पासवान, सतीश दुबे, राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह, अन्नपूर्णा देवी, राजनाथ सिंह, जितिन प्रसाद, पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, बीएल वर्मा, एसपीएस बघेल, कीर्तिवर्धन सिंग, संजय बंडी, जी. कृष्णा रेड्डी, कृष्णपाल गुर्जर, राव इंद्रजित सिंग, मनोहर लाल खट्टर, किरण रिजुजू, सर्बानंद सोनोसल, शंतनू थानूर मल्होत्रा, शोभा करंदलाजे, एचडी कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी, सुरेश गोपी, निर्मला सीतारामन, श्रीपाद नायक, राम मोहन नायडू किंजरापू, चंद्रशेखर पेम्मासानी, कृष्णपाल गुर्जर, एस जयशंकर, शांजु किरनजी, आर. ठाकूर, अश्विनी वैष्णव, हरदीप सिंग पुरी.
अशी आहे मंत्र्यांची यादी
कॅबिनेट मंत्री
नरेंद्र मोदी – पंतप्रधान
राजनाथ सिंह – लखनऊ, उत्तर प्रदेश
अमित शाह – गांधीनगर, गुजरात
नितिन गडकरी – नागपूर, महाराष्ट्र
जे.पी.नड्डा – गुजरात, राज्यसभा
शिवराजसिंह चौहान – मध्य प्रदेश
निर्मला सीतारामन – राज्यसभा
एस. जयशंकर – राज्यसभा
मनोहरलाल खट्टर – कर्नाल हरियाणा
एच.डी.कुमारस्वामी – मंड्या, कर्नाटक
पीयूष गोयल – उत्तर मुंबई, महाराष्ट्र
धर्मेंद्र प्रधान – संबलपूर, ओडिशा
जीतनराम मांझी – गया, बिहार
राजीवरंजन सिंह – मुंगेर, बिहार
सर्वानंद सोनोवाल – राज्यसभा, आसाम
डॉ. वीरेंद्र कुमार – टिकमगड, मध्यप्रदेश
के.आर. नायडू – श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश
प्रल्हाद जोशी – धारवाड, कर्नाटक
जुएल ओराम – सुंदरगड, ओडिशा
गिरीराज सिंह – बेगूसराय, बिहार
अश्विनी वैष्णव – राज्यसभा
ज्योतिरादित्य सिंधिया – गुना, मध्य प्रदेश
भुपेंद्र यादव – अलवर, राजस्थान
गजेंद्रसिंह शेखावत – जोधपूर, राजस्थान
अन्नपूर्णा देवी – कोडरमा, झारखंड
किरेन रिजिजू – अरुणाचल पश्चिम, अरुणाचल प्रदेश
हरदीपसिंह पुरी – राज्यसभा
मनसुख मंडाविया – पोरबंदर, गुजरात
जी किशन रेड्डी – सिकंदराबाद, तेलंगणा
चिराग पासवान – हाजीपूर, बिहार
सी.आर.पाटील – नवसारी, गुजरात
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार
राव इंद्रजिंत सिंह – गुरुग्राम, हरियाणा
डॉ.जितेंद्र सिंह – उधमपूर, जम्मू-काश्मीर
अर्जुन राम मेघवाल – बिकानेर, राजस्थान
प्रतापराव जाधव – बुलडाणा, महाराष्ट्र
जयंत चौधरी –
राज्यमंत्री
जितिन प्रसाद – पिलिभीत, उत्तर प्रदेश
श्रीपाद नाईक – उत्तर, गोवा
पंकज चौधरी – महाराजगंज, उत्तर प्रदेश
क्रिशन पाल – फरिदाबाद, हरियाणा
रामदास आठवले – राज्यसभा
रामनाथ ठाकूर – राज्यसभा
नित्यानंद राय – उजियारपूर, बिहार
अनुप्रिया पटेल – मिर्झापूर, उत्तर प्रदेश
व्ही सोमन्ना – तुमकूर, कर्नाटक
डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर – गुंटूर, आंध्रप्रदेश
एसपी. सिंह बघेल – आगरा, उत्तर प्रदेश
शोभा करंदलाजे – बेंगलोर उत्तर, कर्नाटक
कीर्तीवर्धन सिंह – गोंडा, उत्तर प्रदेश
बी.एल.वर्मा – राज्यसभा
शांतनु ठाकूर – बनगाव, पश्चिम बंगाल
सुरेश गोपी – त्रिशूर
डॉ.एल मुरुगन – तमिळनाडू
अजय टम्टा – अल्मोडा, उत्तराखंड
बंडी संजय कुमार – करीमनगर, तेलंगणा
कमलेश पासवान – बासगाव, उत्तर प्रदेश
भागिरथ चौधरी – अजमेर, राजस्थान
सतीशचंद्र दुबे – राज्यसभा
संजय सेठ – रांची, झारखंड
रवनीत सिंग बिट्टू – पंजाब
दुर्गादास उईके – बैतुल मध्यप्रदेश
रक्षा खडसे – रावेर, महाराष्ट्र
सुकांता मजूमदार – बालूरघाट, पश्चिम बंगाल
सावित्री ठाकूर – धार, मध्य प्रदेश
तोखन साहू – बिलासपूर, छत्तीसगड
डॉ.राजभूषण चौधरी- मुजफ्फरपूर, बिहार
भूपतीराजू श्रीनिवास वर्मा – नरसापूरम, आंध्रप्रदेश
हर्ष मल्होत्रा – पूर्व दिल्ली
निमुबेन बांभणिया – भावनगर, गुजरात
मुरलीधर मोहोळ – पुणे, महाराष्ट्र
जॉर्ज कुरियन – केरळ
पवित्र मार्गरिटा – राज्यसभा