Last Updated on 30 Dec 2024 8:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दीड कोटी सदस्य नोंदणीचा निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून व्यक्त
मुंबई । महाराष्ट्रात येत्या १ ते १५ जानेवारी दरम्यान भारतीय जनता पक्षातर्फे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार असून या दरम्यान भाजपाचे दीड कोटी सदस्य करू, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत आयोजित भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अभियानाच्या कार्यशाळेत ते काल बोलत होते.
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत काल दिवसभर ही कार्यशाळा झाली. दरम्यान,या कार्यशाळेत महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.येत्या १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश महा अधिवेशन घेण्यात येणार असल्याच बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.
या बैठकीत संघटन निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा झाली. .राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीपूर्वी भाजपा संघटन निवडणुकीची प्रक्रिया जानेवारी पर्यंत पूर्ण होण्याचाही शक्यता आहे . जिल्हा स्तरीय निवडणुका प्रथम घेण्यात येणार आहे. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Dec 2025 11:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit 🔸कोणत्या राशीसाठी संधी, कोणासाठी सावधगिरी, जाणून घ्या 🔸आठवड्याची सुरुवात कशी करावी? ग्रह काय सुचवतात 🔸शुभ दिवस, रंग आणि उपाया... Read more













































































