पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा मार्च 2024 चा निकाल सोमवार दि 27 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा 1 मार्च ते 6 मार्च दरम्यान झाली. या परीक्षेसाठी राज्य भरातून दहावीच्या 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
SSC Result 2024 चा असा तपासा निकाल
🌑 mahresult.nic.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
🌑 मेन पेजवर ‘महाराष्ट्र एसएससी निकाल 2024’ साठी असलेल्या लिंकवर क्लिक करा.
🌑 दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
🌑 सबमिट करण्यासाठी ‘निकाल पाहा’ बटणावर क्लिक करा.
🌑 2024 मध्ये तुम्हाला mahresult.nic.in वर 10 वीचा निकाल मिळेल.
🌑 तुमच्याकडे निकाल प्रिंट करण्याचा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेण्याचा पर्याय सुद्धा आहे.
या ऑनलाईन निकालानंतर मूळ गुणपत्रिका कधी मिळणार यांची दिनांक महाराष्ट्र बोर्डाकडून स्वतंत्रपणे कळविले जाणार आहे.
खाली दिलेल्या संकेतस्थळांवर इयत्ता दहावीचा निकाल पाहता येईल.
निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा
विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या निकालात डंका! उत्तुंग यश…९९.५२ टक्के निकाल