अधोरेखित ऑनलाइन डेस्क । कापूसखेड (ता.वाळवा) येथील माजी सरपंच प्रदीप पाटील यांच्या कुटुंबीयांनी आपल्या ‘बाप्पा’ साठी आकर्षक सजावट केली आहे.’कोकोनट थीम’ गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
माजी सरपंच प्रदीप पाटील यांचे चिरंजीव अविष्कार पाटील,कन्या कीर्तिशिला व पुतण्या शंभूराजे पाटील व अभिषेक पाटील यांनी ही ‘कोकोनट थीम’ साकारली आहे.पाटील कुटुंबीय दरवर्षी ‘बाप्पा’ साठी आकर्षक व नाविन्यपूर्ण (Creative) सजावट करतात.त्यानुसार यावर्षी त्यांनी ‘कोकोनट थीम’ साकारली आहे.
याबाबत माहिती देताना अविष्कार म्हणाला,नारळाचा आकार देण्यासाठी 2 कळकी हारे वापरले व आतील बाजुस कापुस चिकटण्यासाठी 2 कळकी पाट्या वापरल्या.बाहेरील बाजुस चिकटण्यासाठी मशीन वर पिंजलेले नारळाचे केसर वापरले आहे. गणपती बसवण्यासाठी चौरंगाचा वापर केला आहे.खोबऱ्या सारखे दिसण्यासाठी कापसाचा वापर केला.शेंडी सारखा आकार तयार करण्यासाठी घरगुती भांड्यांचा वापर केला आहे.
हेही वाचा – गौरी पूजन : समज,गैरसमज; जाणून घ्या
मागील बाजूस मार्केटमध्ये मिळणारे लॉन लावण्यात आले आहे.मागील बाजुस लोखंडाचे एक मजबूत स्टँडसजावटीसाठी नारळाच्या फांद्या व खाली पसरण्यासाठी काळ्या मातीचा वापर केला आहे.हे सर्व एकत्रित पकडुन ठेवण्यासाठी लाकडी व लोखंडी स्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे.