प्रश्न क्र. 1 : भाद्रपद महिन्यातील गौरी आवाहन,पूजन,विसर्जन याचे शास्त्र काय आहे ?
उतर – गौरीचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर केले जाते,पूजन जेष्ठावर आणि विसर्जन मूळ नक्षत्रावर होते .
काही प्रांतात सप्तमीच्या दिवशी आवाहन,अष्टमीला पूजन,नवमीला विसर्जन केले जाते.
अ) गौरी मंगळवारी किंवा शुक्रवारी या दिवशी विसर्जनाचा दिवस आला तर त्या दिवशी विसर्जन करू नये,असे म्हटले जाते.याला शास्त्राधार आहे का?
उत्तर – याला कोणताही शास्त्राधार नाही.गौरी विसर्जन शास्त्रानुसार मूळ नक्षत्रावर करायचे असल्याने मंगळवार किंवा शुक्रवार तसेच कोणत्याही वारी करता येते.
प्रश्न क्र. 2 : अनेक ठिकाणी गौरीचे पितळी किंवा शाडूचे दोन उत्सव मूर्ती म्हणून मुखवटे उभा करून, बाजूला घटावर/तांब्यावर तर,काही ठिकाणी वाटीतील खड्यावर ही गौरीचं पूजन केले जाते तर मी कशा पद्धतीने पूजन करू?
उत्तर – गौरी गणपती हे सण आपल्या भारतीय संस्कृतीतील पूजन आणि उत्सव प्रधान आहेत.उत्सवामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होतं.याची अनुभूती पण नेहमीच या काळात घेत असतो.तरीही यातील पूजनाचा भाव महत्त्वाचा असला तरी आपल्या घरामध्ये जशी प्रथा असेल त्या पद्धतीने पूजन करावे.
प्रश्न क्र.3 : आमच्या घरी व्यक्तीचे निधन होऊन अजून एक वर्ष ही झाले नाही तर आम्ही गौरी बसवू शकतो काय?
उत्तर – काहीही हरकत नाही बसवू शकता फक्त आरास पंचपक्वान्न इत्यादी न करता साध्या पद्धतीने पूजन करावे.फक्त त्याला उत्सवाचे स्वरूप देवू नये.
प्रश्न क्र. 4 : पूर्वी फार मोठ्या पद्धतीची आरास करून गौरी बसवत होते पण वयोमानुसार आता मला जमत नाही.मी कशा पद्धतीने पूजन करू?
उत्तर – आपणस गौरीचे मुखवटे तांब्यावर ठेवूनही पूजन करता येईल.अनेक भाज्या,कोशिंबिरी,पंचपक्वान्न इत्यादी न करता एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून करून दाखवता येईल.
प्रश्न क्र. 5 : मला गौरीचे मुखवटे बसवायचे आहेत.माहेरकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून घ्यायचे असतात असे मी ऐकले याला शास्त्राधार आहे का ?
उत्तर – असे कोणते ही शास्त्र नाही.खरं तर गौरीचे मुखवटे आपणच घेऊन त्याचं पूजन करणे योग्य होईल .
प्रश्न क्र. 6 : गौरीचे दोन मुखवटे बसवले जातात या पाठीमागची भूमिका काय?
उत्तर – यामध्ये श्रावण मासातील शुक्रवारी काही जणांकडे महालक्ष्मी स्थापना केली जाते ती लक्ष्मी व भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर आणलेली गौरी अशा ज्येष्ठा आणि कनिष्ठा म्हणून दोन देवींची पूजा केली जाते.
तर काही जणांकडे भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठा गोरी आणि कनिष्ठा लक्ष्मी भगिनींनीची पूजा केली जाते .
खरं तर ही पूजा सोळा दिवस करायची असते आणि रोज एक दोरा पूजेत घ्यायचा असतो. मात्र सध्याच्या काळात जेष्ठा नक्षत्रावर सोळा दिवसाचे प्रतीक म्हणून 16 गाठी मारलेला दोरा घेऊन नंतर तो दुसऱ्या दिवशी हातात बांधतात .
प्रश्न क्र . 7 : काही कारणामुळे मला भाद्रपदात गौरी पूजन करता आले नाही तर पुढे अश्विन महिन्यात नवरात्रात राहिलेले गौरी पूजन करता येईल का?
उत्तर – याला कोणताही शास्त्राधार नसल्यामुळे तसे करू नये .
प्रश्न क्र. 8 : मला गौरी गणपती उत्सवाची फारच आवड आहे.पण त्या दिवशी मासिक धर्माची अडचण आहे.तर मी गौरी गणपती बसू शकते का?
उत्तर – खरंतर आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीचे महत्व अनन्य साधारण आहे.तिला जगद् माता/जगद्जननी असे म्हटले आहे.खरतर पूर्वी तिला आय.सी.यू सारखी विश्रांती मिळावी हा त्या पाठीमागील उद्देश होता.तर धर्म संकट प्रसंगी रोज पाण्यात गोमूत्र/तुळशीचे पान टाकून स्नान करावे.पळीभर गोमूत्र प्राशन करून पूजन करू शकता .
प्रश्न क्र. 9 : या वर्षी (2023 ) गौरी,आवाहन,पूजन,विसर्जन केव्हा करावे?
(पंचांगाधार – दाते पंचाग )
उत्तर –
आवाहन – गुरुवार दि.21 सप्टेंबर 2023 दु .3 वा.35 मि .पर्यंत
पूजन – शुक्रवार दि.22 सप्टेंबर 2023 रोजी
विसर्जन – शनिवार दि.23 सप्टेंबर 2023 दु .2 वा. 56 मि.पर्यंत
(बाकी या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करा
आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’
डेंग्यू : लक्षणे आणि औषधोपचार
विविध कार्यकारी सोसायट्यांना करता येणार ‘हे’ उद्योग,व्यवसाय; जाणून घ्या
चला पर्यटनाला | निसर्गाचं वरदान : ‘तीर्थक्षेत्र रामलिंग बेट’ बहे