Last Updated on 31 May 2020 9:15 AM by
दिवाळी आणि महाशिवरात्रीनिमित्त येथे दर्शनासाठी भाविक तुंबळ गर्दी
विविधतेत एकता असलेल्या भारतात संस्कृती, परंपरा आणि चालीरितींचे अनेकविध रंग आपल्याला पाहायला मिळतात. याच नानाविध प्रकारांमध्ये अद्भूत आणि चमत्कारिक मंदिरेही पाहायला मिळतात. भारतातील विविधांगी गोष्टीची माहिती आपल्याला केवळ आश्चर्यचकीत करते. पाऊस पडण्यासाठी आपण बेडकाचे लग्न लावण्याच्या कथा ऐकतो. मात्र, भारतात असे एक ठिकाण आहे,जेथे बेडकाचे मंदिर असून, तेथे बेडकाची पूजा केली जाते.
जगाच्या पाठीवरचे एकमेव असलेले हे मंदिर भारतात असून या मंदिरात बेडकांची चक्क पूजाही केली जाते. बेडकांचे हे मंदीर उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील ओयल या भागात कधीकधी दुष्काळ तर कधी महापूर येतच असतो.या दुष्काळात अनेक लोकांचे हाल होतात. म्हणूनच पाऊस नियमीत पडण्यासाठी हे मंदीर बांधण्यात आले आहे.
भारत देशात कधी काही विचित्र बघायला मिळेल हे सांगता येत नाही.आपल्याकडे शहरात व खेड्यापाड्यात देवांची मंदीर ही सहजपणे पहायला मिळतात.अगदी या मंदीरांची संपत्ती आठवड्याला कोटींच्या घरात जात असते.भारतात जगातील विवीध शैलीचे अगदी प्रशस्त मंदीर पहायला मिळतात. हेमाडपंथी, नागर, द्रविड शैलीची मंदिरे आपण सहसा पाहत असतो. भारतात मात्र एक भलमोठ्ठ मंदिर हे बेडकांसाठी ओळखलं जाते.
शिवलिंगाचा रंग बदलतो
हे मंदिर २०० वर्ष जुने आहे. लखीमपूर जिल्ह्यातील ओयल भागात दुष्काळ आणि महापूर या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व्हावा, यासाठी हे बेडकाचे मंदिर उभारण्यात आले. या मंदिरातील शिवलिंगाची गोष्टही अगदी निराळी आहे. या मंदिरातील शिवलिंगाचा रंग बदलत असतो. या मंदिरासमोर नंदीची उभी मूर्ती आहे. भारतभरातील अन्य सर्व मंदिरांमध्ये शिवलिंगासमोरील नंदी बसलेल्या स्थितीत आढळतो.
अशी आहे मंदिराची रचना
या मंदिराच्या भींतींवर तांत्रिक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. त्याचप्रमाणे मंदिरात विचित्र प्रकारची अनेक चित्रे पाहायला मिळतात. चित्र विचित्र असली, तरी यामुळे मंदिराला एक आकर्षक स्वरूप येते. मंदिर परिसरात बेडकाची मूर्ती आहे.
तंत्रवादावर आधारित मंदिर
या मंदिराचे बांधकाम तंत्रवादावर आधारित आहे. तंत्र-मंत्र करताना जशी रचना केली जाते, तसे याचे स्वरूप आहे. या रचनेमुळे हे मंदिर अद्भूत दिसते आणि येथे आलेला प्रत्येक जण या मंदिराची संरचना पाहून मंत्रमुग्ध होतो.
ओयल साम्राज्याचे केंद्र
जुन्या ऐतिहासिक कथेनुसार, ओयल शैव साम्राज्यात हे मंदिर बांधले गेले आणि हे मंदिर ओयल साम्राजाचे केंद्र होते. ओयल शासकांनी हे मंदिर उभारले. हे भगवान शंकराचे स्थान असल्यामुळे या मंदिराला नर्मदेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
हजारो भक्तांकडून दर्शन
बेडकाच्या मंदिरात दररोज हजारो भक्त दर्शनासाठी हजेरी लावतात. दिवाळी आणि महाशिवरात्रीनिमित्त येथे विशेष पूजाविधीचे आयोजन करण्यात येते. या मंदिरात पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.











































































