Last Updated on 17 Nov 2021 10:38 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
वाशी-नवीमुंबई येथे वास्तव्यास असलेल्या,पाडळी (ता शिराळा) येथील सौ.चंद्रप्रभा पांडुरंग पाटील (वय ६६) यांचे सोमवारी पहाटे नवीमुंबई येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने निधन झाले.
सांगली वैभव को ऑप क्रेडिट सोसायटी लि व वसंतराज को ऑप क्रेडिट सोसायटी लि नवी मुंबई,आम्ही सांगलीकर संघटना मुंबई,डॉ पी आर पाटील-बापू फाउंडेशन पाडळी शिराळा या संस्थांचे अध्यक्ष डॉ पी आर पाटील-बापू यांच्या त्या पत्नी व अजय इंटरनॅशनल स्कूल शिराळा रेड,नचिकेता गौरव कुंज प्राथमिक मराठी शाळा या संस्थेचे सचिव अजय पाटील व न्यूयॉर्क-अमेरिका येथे नवजात शिशु विभागाचे बालरोगतज्ज्ञ डॉ उदय पाटील व सांगली वैभव सोसायटीच्या प्रभारी सरव्यवस्थापीका संध्या संजय बामुगडे यांच्या मातोश्री होत,त्यांच्या पश्चात पती,विवाहित दोन मुले,एक मुलगी,दोन भाऊ,तीन बहिणी,दिर,पुतणे,सुना नातवंडे असा परिवार आहे.











































































