Last Updated on 23 Apr 2025 7:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । हॉटेल बाहेरील झाडांवर विद्युत रोषणाई केली असल्याचं आढळून आल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने हॉटेल चालकांना १० हजारांचा दंड ठोठावला आहे.
नागरिकांनी तसंच व्यावसायिकांनी झाडांवर खिळे ठोकणे तसंच विद्युत रोषणाई करू नये अन्यथा महापालिकांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं आवाहन वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलं होतं. त्यानंतरही झाडांवर विद्युत रोषणाई करत असल्याबद्दल कारवाई करण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी बेलापूर सेक्टर ३ इथल्या हॉटेल चालकाला १० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
काल तुर्भे विभाग कार्यालयाच्या भरारी पथकाने सेक्टर १८ इथल्या हॉटेल सेक्टर १९ इथल्या हॉटेल यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. या दोघांकडून प्रत्येकी १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.











































































