Last Updated on 27 Jan 2025 5:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिट कार्यस्थळावर देशाचा प्रजासत्ताक दिन देशभक्तीपर भाषणे, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आदी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माजी मंत्री आ.जयंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले,राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला जी अद्वितीय राज्यघटना दिली आहे, त्यातून आपणास अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे. आपण सर्वांनी आपल्या देशा तील राज्यघटना व लोकशाहीच्या बळकटी साठी प्रयत्नशील रहायला हवे. यावेळी सुरक्षाधिकारी विरसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांनी ध्वजसंचलन करून मानवंदना दिली.
कु.सविर सरवदे,रुद्र पाटील,अदिती सुर्यवंशी,प्रज्ञा दवणे,जान्हवी अवघडे प्रणिती सोलवंडे या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रजा सत्ताक दिनाचे महत्व सांगणारी भाषणे केली. कु.अभिवर्धन आवळे याने उत्कृष्ठ पोवाडा, विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल,मॉडर्न हायस्कुल,नूतन मराठी विद्यालय व प्रियदर्शनी बालवाडीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भरगच्च असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, प्राचार्य अजित पाटील,प्र.मुख्याध्यापिका गीतांजली माळी,राजेंद्र जांभळे,सचिवडी. एम.पाटील,शंकरराव भोसले,विजय मोरे, सुनिल सावंत,प्रशांत पाटील,प्रेमनाथ कमलाकर,महेश पाटील,राजेंद्र चव्हाण यांच्यासह अधिकारी,कर्मचारी,कुटुंबिय, ग्रामस्थ,विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर तिन्ही युनिटवरही उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा
वाटेगाव-सुरुल युनिट कार्यस्थळावर संचालिका डॉ.योजना शिंदे-पाटील,कारंदवाडी कार्यस्थळावर संचालक प्रदीपकुमार पाटील, तर तिप्पेहळळी-जत कार्यस्थळावर कामगार संचालक विकास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुरक्षधिकारी दत्तात्रय गायकवाड,जयवंत पाटील,नामदेव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षकांनी ध्वज संचलन करून मानवंदना दिली. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी संताजी चव्हाण,संभाजी सावंत,संग्राम चव्हाण,उमेश शेटे,सुदाम।पाटील,नंदकिशोर जगताप, हणमंत धारीगौडा यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.











































































