Last Updated on 03 Oct 2021 1:09 AM by Sanjay Patil/Adhorekhit
स्वप्न शास्त्रात स्वप्नांच्या बाबतीत माहिती मिळते. स्वप्न हे भविष्यात होणार्या चांगल्या वाईट घडणार्या घटनांना दर्शवतात. असे म्हटले जाते की स्वप्न शास्त्राच्याद्वारे स्वप्नांचे अर्थ समजले जाऊ शकतात आणि हे शोधले जाऊ शकते की या स्वप्नांचे फळ भविष्यामध्ये कश्या प्रकारे मिळणार आहे. असे म्हणतात की स्वप्न शास्त्रात उत्तम ज्ञानीसुद्धा स्वप्नाचे युक्तिवाद नाकारत नाही. जाणून घेऊ या अशा काही स्वप्नांबद्दल ज्यांना स्वप्नशास्त्रात अशुभ सांगितले आहे.
1 ज्या प्रकारे काळी मांजर आडवी येणं अशुभ मानले जातात. तसेच काळी मांजर स्वप्नात बघणे देखील अशुभ आहे. या मुळे अशुभ फळांची प्राप्ती होते. स्वप्नशास्त्रांनुसार या स्वप्नांचा परिणाम माणसाच्या मानसिक स्थिती वर पडतो. असा विश्वास आहे की या स्वप्नांच्या प्रभावाला कमी करण्यासाठी भगवान शंकराची उपासना केली पाहिजे.
2 असे म्हणतात की स्वप्नात माणसाने कपड्यांवर पिवळे डाग बघणे अशुभ आहे. या स्वप्नांचा दुष्प्रभाव माणसाच्या आर्थिक स्थिती वर पडतो.
3 दारावर कडी लावलेली बघणे अशुभ असते यामुळे माणसाला करिअरमध्ये अशुभ फळांची प्राप्ती होते. असे म्हणतात की स्वप्नांचा परिणाम माणसाच्या कार्यक्षेत्रावर नकारात्मक पडतो.
4 स्वप्नात प्राण्यांचा कळप दिसल्याने अशुभ फळाची प्राप्ती होते. असे म्हणतात की हे स्वप्न माणसाच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात.
आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ नेमका काय आहे?
आपल्यापैकी प्रत्येकाला रात्रीच्या झोपेमध्ये स्वप्ने ही कधी ना कधी पडतातच. या स्वप्नांचा आपल्या वास्तविक आयुष्याशी फारसा संबंध असतोच असे नाही, किंबहुना अनेकदा आपण स्वप्नामध्ये पाहिलेल्या वस्तू, व्यक्ती आपल्या अजिबात परिचयाच्याही नसतात. स्वप्नामध्ये एखाद्या विहिरीमध्ये साप दिसणे, कोणीतरी किंवा आपण स्वतःच विहिरीत पडले असल्याचे स्वप्न पडणे, पाण्यामध्ये बुडत असल्याचे स्वप्न, किंवा एखाद्याचा पाठलाग करीत असल्याचे स्वप्न अशी चित्रविचित्र स्वप्नेही क्वचित एखाद्याला पडत असतात. अनेकदा तर आपल्याला आग आल्यानंतर या स्वप्नांचे अर्थ लावणे आपल्याला कठीण जाते. किंबहुना आपल्याला असे विचित्र स्वप्न का पडले असावे याचेच आश्चर्य आपण करीत राहतो. स्वप्नशास्त्र, हे स्वप्नांचे अध्ययन करण्याचे, त्यांचे अर्थ लावण्याचे शास्त्र आहे, या शास्त्राच्या अनुसार आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा आपल्या आयुष्याशी स्पष्ट किंवा अस्पष्ट संबंध असतोच.
अनेकदा अतिशय वाईट स्वप्ने वारंवार पडणे हे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडून येणाऱ्या वाईट प्रसंगाची पूर्वसूचना असू शकते, तर अनेक स्वप्ने ही एखाद्याच्या भावी आयुष्यामध्ये घडून येणार असलेल्या चांगल्या घटनांचा संकेत असू शकत असल्याचे स्वप्नशास्त्र म्हणते. या शास्त्राच्या अनुसार जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला वाळूवर, किंवा रेतीवर चालताना पाहिले, तर हे स्वप्न ही पुढील धोक्याची पूर्वसूचना असून, आपल्या शत्रूकडून आपल्याला मोठी हानी संभविणार असल्याचे हे सूचक असल्याचे स्वप्नशास्त्र सांगते. स्वप्नामध्ये झाड कापले जाताना पाहणे हे ही शुभ संकेत देणारे नाही. आगामी काळामध्ये मोठे नुकसान सोसावे लागण्याची ही पूर्वसूचना आहे. त्याचप्रमाणे पूर आल्याचे किंवा स्वतः पाण्यामध्ये बुडत असल्याचे स्वप्नही अशुभ संकेत देणारे समजले जाते.
स्वप्नामध्ये आपले पैसे हरविणे, चोरी होणे, हे देखील आर्थिक संकटाचे सूचक मानले गेले आहे. त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये एखाद्या नैसर्गिक आपदेचे दर्शनही अशुभ मानले जाते. स्वप्नामध्ये स्वतःला जुगार खेळताना पाहणे, किंवा रिकामी तिजोरी दिसणे देखील आर्थिक संकटाचे पूर्वसूचक मानले गेले आहे.











































































