पुणे । राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. मागील काही दिवसांपासून विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले.शेवटी आज दहावीचा निकाल लागला आहे. विशेष म्हणजे यंदा दहावीच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे.दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागला आहे.विशेष म्हणजे बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे.राज्याचा दहावीचा 95. 81 टक्के निकाल लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला.कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.01 टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी 94.73 टक्के लागला.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की यंदा परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. त्यासाठी २७१ भरारी पथके, महिलांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. त्याशिवाय जिल्हा स्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. आठ माध्यमांत ही परीक्षा घेण्यात आली. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन घेण्यात आल्याने निकाल लवकर जाहीर करण्यास मदत झाली.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,60,154 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,49,336 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,84,441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 95.81 आहे.
विभागनिहाय निकाल
पुणे – 96.44
नागपुर – 94.73
छत्रपती संभाजीनगर – 95.19
मुंबई – 95.83
कोल्हापूर – 97.45
अमरावती – 95.58
नाशिक – 95.28
लातूर – 95.27
कोकण – 99.01
- 16 लाख 21 विद्यार्थी परीक्षेला बसले
- 15 लाख 17 हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण
- 94.86 टक्के निकाल
- 9149 दिव्यांग विद्यार्थी, 9078 परीक्षेला बसले,
- 8465 विद्यार्थी उत्तीर्ण
- दिव्यांग विद्यार्थी निकाल 93.25 टक्के
- कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वोत्तम : 99.00 टक्के निकाल
- सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 94 टक्के
- मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 97.21 टक्के
- मुलांची टक्केवारी : 94.56 टक्के
- यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी
- 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला.
ऑनलाईन निकाल कुठे व कसा पाहाल… घ्या जाणून
SSC Result 2024 चा असा तपासा निकाल
🌑 mahresult.nic.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
🌑 मेन पेजवर ‘महाराष्ट्र एसएससी निकाल 2024’ साठी असलेल्या लिंकवर क्लिक करा.
🌑 दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
🌑 सबमिट करण्यासाठी ‘निकाल पाहा’ बटणावर क्लिक करा.
🌑 2024 मध्ये तुम्हाला mahresult.nic.in वर 10 वीचा निकाल मिळेल.
🌑 तुमच्याकडे निकाल प्रिंट करण्याचा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेण्याचा पर्याय सुद्धा आहे.
या ऑनलाईन निकालानंतर मूळ गुणपत्रिका कधी मिळणार यांची दिनांक महाराष्ट्र बोर्डाकडून स्वतंत्रपणे कळविले जाणार आहे.