सांगली । इस्लामपूर येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या खासदार एस .डी .पाटील विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज( self finance ) च्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळविले. महाविद्यालयाचा निकाल 98.63 टक्के लागला.
श्रेया शरद पाटील हिने 89.17 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला.सायली शिवाजी जाधव (77.00 टक्के), ओंकार सुनील वाकळे (76.50 टक्के),सोहम विनायक नायकल (74.67 टक्के) श्रावणी बाजीराव पाटील (74.50 टक्के) तनिष्का राजाराम मोहिते (73.50 टक्के) तसेच विराज अशोक सुतार (72.83 टक्के) व Biology विषयात 95 गुण मिळविले.
हेही वाचा – विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या निकालात डंका! उत्तुंग यश…९९.५२ टक्के निकाल
संस्थेचे मानद सचिव ॲड.बी एस पाटील, सहसचिव.ॲड. धैर्यशील पाटील, प्राचार्य एस. डी. खोत, प्रा संग्राम पाटील, प्रा. आरती धोत्रे,प्रा.प्रियांका जाधव,प्रा. डी. बी. जाधव,प्रा हरिश्चंद्र कदम,प्रा मकरंद बडवे ,प्रा एम. व्ही. विभुते तसेच शंतनू पाटील,डी बी माने, भागवत वाटेगावकर,ममता मोरे, आसावरी फल्ले,सुकन्या पाटील,किशोर कानडे या सर्वांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.