सांगली । वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या इस्लामपूर येथील यशवंतराव महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. अशोक शिंदे यांची सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टी मेंबर (विद्या शाखा सदस्य) म्हणून निवड झाली आहे.
डॉ. अशोक शिंदे हे शिवाजी विद्यापीठाच्या अकौटन्सी बोर्ड ऑफ स्टडीजचे देखील सदस्य व विद्यापीठाच्या फॅकल्टी मेंबर म्हणूनही ते काम पाहत आहेत. शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगली या संस्थेने आदर्श शिक्षक म्हणून त्यांना नुकतेच सन्मानित केले आहे. वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानद सचिव अँड. बी. एस. पाटील, सहसचिव अँड. धैर्यशील पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ.ए. एम. जाधव व महाविद्यालयाच्या सहकाऱ्यांचे त्यांना प्रोत्साहन लाभले.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा ![](https://adhorekhit.com/wp-content/uploads/2024/01/lll-1-300x2.jpg)