Last Updated on 18 Sep 2021 6:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख देण्यात आली होती. आता ही मुदत सहा महिन्यांनी वाढवण्यात आली असून ज्यांनी आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल केले ते ३१ मार्च २०२२ पर्यंत करू शकतात. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे.आयकर विभागाने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.करोना महामारीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आधार-पॅन कार्ड लिंक करण्याच्या काही टीप्स
- पॅन कार्ड-आधार कार्डला लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- आपला पॅन कार्ड नंबर, आधार नंबर, नाव आणि मोबाईल नंबर त्या वेबसाईटवर टाका.
- आधार कार्डवर फक्त जन्मवर्षच असेल तर “I have only year birth in Aadhar Card” या पर्यायावर क्लिक करा. पूर्ण जन्मतारीख असेल तर हा पर्याय निवडण्याची गरज नाही.
- त्यानंतर “I agree to validate my Aadhar details” या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा. अशाप्रकारे आधार कार्ड आणि पॅन कार्डसोबत लिंक होईल.











































































