धनत्रयोदशी
शुक्रवार, दि 10/11/2023
गुरुद्वादशी ,धनत्रयोदशी-धन्वंतरी जयंती
यमदीपदान
अपमृत्यू येऊ नये म्हणून, खालील मंत्रांनी यमाची प्रार्थना करून दीप पूजन करावे
यम प्रार्थना मंत्र
मृत्यूंना पाशदंडाभ्यां कालेन: श्याम यासह ।
त्रयोश्यां दीपदानत् सूर्यज: प्रियतां मम॥
दीर्घायुषीआरोग्य लाभावे म्हणून धन्वंतरी पूजन केले जाते. (‘अधोरेखित’ च्या Facebook ला लाईक किंवा फॉलो करा)
Dhanteras 2023 : हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे.धनत्रयोदशीचा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो.या सणाला धनतेरस म्हणून ओळखतात.धनतेरस हा शब्द ‘धन’ आणि ‘तेरस’ या दोन शब्दांपासून बनला आहे.धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस तेरावा दिवस दर्शवितो.
हेही वाचा – दीपोत्सव 2023 – माझी संस्कृती…माझा अभिमान
असे मानले जाते की,या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली.आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरीची उत्पत्ती झाल्याकारणाने या दिवशी धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
दिवाळीच्या पाच दिवसांची सरुवात ही धनत्रयोदशीने होते.या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात.घर दिव्यांनी सजवतात.धनाची देवी ‘धन्वंतरी’ ची पूजा करून अभिषेक केला जातो.
‘धन्वंतरी’ची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते.बऱ्याचशा लोकांचे मानणे आहे की याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते.सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.