Last Updated on 30 Oct 2023 5:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा म्हणून हे बेमुदत उपोषण : साखळी उपोषणालाही सुरवात
सांगली । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला वाळवा तालुक्यात वाढता पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज वाळवा तालुका यांच्या वतीने इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर बी.जी.पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज वाळवा तालुका यांच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली.रॅलीची सुरवात वाळवा पंचायत समिती आवारातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरवात केली.तहसील कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर बी.जी.पाटील यांच्या बेमुदत उपोषणास सुरवात झाली.
यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील,माजी नगरसेवक शहाजी पाटील,दिग्विजय पाटील,उमेश कुरळपकर,उमेश शेवाळे,दिग्विजय मोहिते,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव,वैभव कोकाटे,सरपंच तेजस्विनी पाटील,प्रकाश पाटील,वैभव जाधव,रणजित पाटील,सचिन पवार,दिग्विजय मोहिते,वैभव घोरपडे,माणिक मोरे,अजित हवलदार,उदय सरनोबत,लखन गायकवाड,प्रशांत पाटील,दिग्विजय शिंदे,सत्यजित पाटील,अजित पाटील,सुनील पाटील,विनय पाटील,अक्षय पाटील,ओंकार पाटील,अजित बर्गे,विक्रम पाटील,राहुल पाटील,सुरेश पाटील,जयकर खांबे,प्रकाश पोरवाल,सुहास पाटील आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावाच्या वतीने त्याच ठिकाणी साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.हे उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयापर्यंत सुरु राहणार आहे.आज अनेक मराठा समाजबांधव या साखळी उपोषणात सहभागी झाले.दरम्यान,माजी नगरसेवक खंडेराव जाधव,विजयकुमार पाटील,गजानन पाटील,जयकर शिंदे,महादेववाडी सरपंच अशोक यादव,सरपंच तेजस्विनी पाटील,आयुब हवलदार आदी तसेच इस्लामपूर वकील संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.तसेच उद्या (मंगळवारी) कामेरी,वाघवाडी व विठ्ठलवाडी येथील मराठा समाजबांधव साखळी उपोषण करणार आहेत.












































































