प्रश्न 1) खंडग्रास चंद्रग्रहण हे कोणकोणत्या प्रदेशात दिसेल ?
भारतासह संपूर्ण आशिया,ऑस्ट्रेलिया,रशिया ,संपूर्ण युरोप, संपूर्ण आफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसेल.
प्रश्न 2) या ग्रहणाचा स्पर्श,मध्य आणि मोक्ष कधी आहे ?
28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण
ग्रहण स्पर्श -शनिवारी रात्री 01.05
ग्रहण मध्य – रात्री 01.44
ग्रहण मोक्ष – रात्री -02.23
प्रश्न 3) ग्रहणाचा एकून पर्वकाल किती आहे ?
ग्रहणाचा पर्वकाल 01 तास 18 मिनिटांचा आहे.
प्रश्न 4) हे ग्रहण कसे दिसेल?
हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसेल.
प्रश्न 5) ग्रहणाचा वेध कधी आहे?
हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने 3प्रहर आधी म्हणजे…शनिवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 03 वाजून 14 मि. पासून ग्रहणाचे वेध सूरु होत आहे.
हेही वाचा : देवी नवरात्रातील विज्ञान आणि शंका समाधान
प्रश्न 6) हे ग्रहण कोणी व किती वाजेले पासून पाळावे?
गर्भवतीने आणि बाल वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती यानी शनिवारी सायंकाळी 07 वा.41 मिनिटांपासून वेध पाळावे.
वेधामध्ये भोजन करू नये.स्नान जप देवपूजा,श्राद्ध करता येतील.तसेच पाणी पिणे,झोपणे,मल मूत्रोत्सर्ग करता येईल.मात्र ग्रहण पर्वकाळात म्हणजे – रात्री 01 वाजून पाच मिनिट ते 02 वाजून 23 मिनिट या काळात पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नये.
प्रश्न 7) ग्रहणात कोणती कृत्ये करावी ?
ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे.पर्व काळामध्ये देवपूजा,तर्पण,श्राद्ध,जप,होम,दान करावे.पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पूरश्चचरण चंद्रग्रहणात करावे.ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे.
प्रश्न 8) ग्रहणात कोणती कृत्ये करू नयेत?
मलमूत्रोत्सर्ग,अभ्यंग,भोजन व कामविषय सेवन ही कर्म करू नयेत.अशौच असता ग्रहणासंबंधी स्नान,दान करण्यापूर्वी शुद्धी असते.
प्रश्न 9) या खंडग्रास ग्रहणाचे राशी परत्वे फल कोणते?
मिथुन,कर्क,वृश्चिक कुंभ या राशींना शुभ फल आहे.
सिह,तुळा,धनु,मीन या राशींना मिश्र फल आहे.
मेष,वृषभ,कन्या,आणि मकर या राशींना अनिष्ट फल आहे .
या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तीने आणि गर्भवतीने हे ग्रहण पाहू नये.
प्रश्न 10) ग्रहाणादिवशी कोजागरी पौर्णिमा असल्यामुळे दुग्धपान करावे की करू नये?
या वर्षी दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असून शनिवारी रात्री 01 वा .05 मि. ते 02 वा. 23 मि. असा ग्रहणाचा पर्वकाळ आहे.
त्यापूर्वी वेधकाळात प्रतिवर्षी प्रमाणे रात्री यावेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवता येईल.मात्र प्रसाद म्हणून केवळ एक चमचाभर दूध प्राशन करुन,राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल.
थोडक्यात वेधात खाण पानाला मर्यादा असलेमुळे या दिवशी लक्ष्मी,इंद्र पुजण करून प्रसाद म्हणून चमचाभर दुध घेवून,कोजागरी निमित्ताने केला जाणारा आनंद उत्सव उदा.खाणं,गाणं,दुधपान आणि निमित्ताने केला जाणारे संगीत कार्यक्रम दुसरे दिवशी साजरे करावयास काहिच हरकत नाही.
या दिवशी फक्त लक्ष्मी इंद्र,पूजन करून फक्त प्रसाद म्हणून चमचाभर दूध प्राशन करावे.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.