Last Updated on 10 Oct 2023 10:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी ताकारी येथे गाड्या रोखल्या; वाहतूक बंद पाडली
सांगली । जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची ठिणगी पडली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवारी) सायंकाळी ताकारी येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याची दारु रोखली.संतप्त कार्यकर्त्यांनी कारखान्यांच्या गाड्या परत पाठवल्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने ४०० रूपये प्रतिटन हप्त्यासाठी खा.राजु शेट्टी यांनी कोल्हापूर येथे १३ सप्टेंबर रोजीसाखर आयुक्त कार्यालयावर विराट असा मोर्चा काढला होता.२ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते.त्यावेळी साखर कारखान्यातून साखर व इतर कोणत्याही प्रकाराचा माल बाहेर पडू न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता.
परंतु आज क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल यांच्याकडून मुंबई येथे नावा शिवा बंदरात कारखान्याची दारू पाठवण्यात येत होती.त्यावेळी क्रांती कारखान्याच्या दारूच्या गाड्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी ताकारी येथे रोखून धरल्या.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे,भागवत जाधव ,प्रवक्ते अँड एस, यु. संन्दे,जगन्नाथ भोसले,अनिल करळे,प्रताप पाटील,पंडित सपकाळ,बाबुराव शिंदे, सचिन यादव व स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.











































































